पुणे: विद्यापीठांमध्ये आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांमधून महापुरुषांचे विचार पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचा किंवा हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि केंद्र-राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. जर्मनीमध्ये हिटलरने जसे विचार दाबण्यासाठी पुस्तकांवर बंदी घातली होती, अगदी तीच पद्धतशीर विचारसरणी आज देशात राबवली जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. सरकारकडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची ताकद परीक्षा पाहत आहे का, असा सज्जड सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
इतिहास आणि शिक्षणातून विचार हद्दपार करण्याचा डाव:
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील विद्यापीठांमध्ये आणि शिक्षण प्रणालीमध्ये शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार शिकवले जातात. परंतु, आता हेच विचार शिक्षणातून आणि जनमानसातून हद्दपार करण्याचे मार्ग अवलंबले जात आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हिटलरच्या राजवटीची आठवण करून देत ते म्हणाले की, जसा हिटलरने आपल्या विरोधकांचे विचार संपवण्यासाठी पुस्तकांवर बंदी घालण्याचे हत्याৰ उपयोगात आणले होते, अगदी तशीच विचारसरणी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सत्ताधाऱ्यांकडून वापरली जात आहे. या जुन्या ऐतिहासिक दाखल्यांचा उल्लेख करत त्यांनी १९७८-७९ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'रिडल्स इन हिंदुइझम' पुस्तकावरून झालेल्या वादाची आठवण करून दिली. त्यावेळी लाखो फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले होते, परिणामी सरकारला आपले निर्णय मागे घ्यावे लागले होते, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
मनुवाद आणि 'जेन झी' (Gen Z) पिढीला आवाहन:
सध्याची व्यवस्था ही महिला, शूद्र आणि अतिशूद्रांना पुन्हा एकदा सामाजिक बंधनात आणि गुलामगिरीत ठेवणारी 'मनुवादी' व्यवस्था असल्याचा घणाघात आंबेडकरांनी केला. परंतु, आजची नवी पिढी आणि जनता आता गुलाम म्हणून जगण्यास अजिबात तयार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जर सरकारने आपली ही दडपशाहीची भूमिका तात्काळ मागे घेतली नाही, तर संतापलेली जनता पुन्हा एकदा उतरल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
याचसोबत, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अल्पसंख्याकांबाबतच्या विधानांवर टिप्पणी करताना त्यांनी संघाच्या भूमिकेत स्पष्टपणे दुहेरीपणा (Double Standards) असल्याचा आरोप केला. भाजप आणि त्यांची यंत्रणा कितीही दबावाचे राजकारण करत असली, तरी सध्या विरोधकांमध्ये अपेक्षित अशी ठोस एकजूट दिसून येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करता ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, आताच्या काळातील तरुण पिढी म्हणजेच 'जेन झी' (Gen Z) जनसमूहाने आणि फुले-आंबेडकरी विचारवाद्यांनी स्वतः पुढे येऊन या लोकशाही विरोधी लढ्याची धुरा आपल्या हातात घ्यावी, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केले.
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!



























Subscribe to my channel




