अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

Three brothers killed in tragic road accident on Nevasa Shrirampur road while riding new motorcycle | नवी बाईक घेऊन नातेवाइकांना भेटायला निघालेल्या तीन भावांचा अपघाती मृत्यू, अज्ञात वाहनाने दिली धडकअहिल्यानगर: नव्या दुचाकीवर राहाता येथील नातेवाइकांकडे जाणाऱ्या तिधा सख्ख्या भावंडांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. नेवासा-श्रीरामपूर मार्गावर पुनतगाव फाटा येथे गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. आदित्य अंबादास आहिरे (१६), दीपक अंबादास आहिरे (१४) आणि चैतन्य अंबादास आहिरे (१२), अशी मृत भावंडांची नावे आहेत. या घटनेमुळे माळीचिंचोरा गावावर शोककळा पसरली होती. शुक्रतारी त्यांच्यावर एकाच ठिकाणी दफनविधी करण्यात आला.

माळीचिंचोरा येथील अंबादास आहिरे यांनी घरगुती वापरासाठी दोन दिवसांपूर्वीच नवी दुचाकी खरेदी केली होती. घरात नवीन गाडी आल्याने तिघेही भाऊ प्रचंड आनंदात होते. गुरुवारी रात्री हे तिघे भाऊ याच नवीन दुचाकीवर राहाता येथील आपल्या नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघाले. नेवासा-श्रीरामपूर मार्गाने जात असताना पुनतगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात तिघेही भाऊ गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले.

शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तिघे अल्पवयीन असल्याने त्यांचा एकाच ठिकाणी दफनविधी करण्यात आला. या अपघात प्रकरणी दादासाहेब मुरलीधर आहिरे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.


नावामुळे पटली ओळख
दुचाकी नवीन असल्याने अद्याप पासिंग नंबर आलेला नव्हता. मात्र, अपघाताचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व दुचाकीच्या सीटवर 'आहिरे' असे नाव लिहिलेले होते. त्यामुळे मृतांची ओळख पटण्यास मदत झाली.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *