पुणे: कोलाड महामार्गावर असलेल्या लवळे फाटा (ता. मुळशी) येथे शनिवार (दि. ३) रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यामध्ये सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपर सह आयशर टेम्पो आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. तेव्हा या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत यापैकी दोघांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या बाबतचे वृत्त असे की पुण्याहून पौडच्या दिशेने सिमेंट घेऊन जाणारा ट्रक हा पिरंगुट घाटातून भरधाव वेगाने येत होता. घाटाच्या तीव्र उतारावर असलेल्या लवळे फाट्याजवळ घाट उतरून वेगाने खाली आला असता या ट्रकचे ब्रेक फेल झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे भरधाव वेगातील अनियंत्रित झालेल्या या ट्रकने समोर उभ्या असलेल्या डंपर गाडीला तसेच आयशर टेम्पो व दोन दुचाकींना जोरदार धडक दिली व धडकेनंतर हा ट्रक रस्त्याच्या एका बाजूला जाऊन एका भिंतीला धडकला या दुर्घटनेत या ट्रकचे पुढील चाक हे निखळून खाली पडले होते.
धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे तर या दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या लक्ष्मण कुबल (रा, गणेशनगर पिरंगुट ता, मुळशी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पाठीमागे बसलेला व्यक्ती हा गंभीर जखमी झाला आहे तर उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर पुणे कोल्हाड या महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पिरंगुट पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले तर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
लवळे फाटा येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वारंवार स्थानिक नागरिकांमधून होत आहे. परंतु अद्याप तरी प्रशासनाकडून यावर कुठलीही ठोस उपायोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- महाराष्ट्र: धावणाऱ्या परराज्यातील गाड्यांवर आरटीओचा मोठा बडगा; ५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




