उत्तर प्रदेश: देशाच्या राजकारणात सर्वाधिक महत्त्वाचे आणि राजकीय घडामोडींचे केंद्र असलेल्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आतापासूनच अत्यंत आक्रमक आणि कंबर कसलेली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्तेची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजप हायकमांड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) संयुक्तपणे गुप्त सर्वेक्षण (Internal Survey) हाती घेतले असून, या सर्वेक्षणामधून अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जनमानसातील रोष आणि वाढती 'अँटी-इनकंबेंसी' (Anti-Incumbency) लक्षात घेता, पक्षाकडून तब्बल १०० पेक्षा अधिक विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षांतर्गत सर्वेक्षणातील धक्कादायक खुलासे: लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात बसलेल्या धक्क्यानंतर आणि विरोधकांच्या वाढत्या आक्रमकतेनंतर भाजपने कोणतीही जोखिम न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व ४०३ मतदारसंघांमध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने विविध पातळ्यांवर हा सर्व्हे करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार, राज्यातील जवळपास १२५ ते १२८ आमदारांच्या विरोधात आणि त्यांच्या कामगिरीबद्दल जनमानसात मोठी नाराजी असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पातळीवर पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार यांच्यात समन्वय नसणे, विकासकामांची धीमी गति तसेच आमदारांच्या विरोधात असलेला रोष या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.
आरएसएसचा फीडबॅक आणि 'डेंजर झोन'मधील आमदार: सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान आमदारांच्या कामगिरीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देखील आपला ग्राउंड फीडबॅक पक्षाच्या उच्चाधिकाऱ्यांना दिला आहे. आमदारांना अ, ब आणि क (A, B, C) अशा वर्गवारीत विभाजित करण्यात आले असून, जे आमदार कामगिरीच्या निकषांवर आणि जनमानसातील लोकप्रियतेच्या कसोटीवर अपयशी ठरले आहेत, त्यांना थेट 'डेंजर झोन'मध्ये ठेवण्यात आले आहे. पक्षाने स्पष्ट केले आहे की, आगामी २०२७ च्या निवडणुकीत कोणत्याही आमदाराचे तिकीट केवळ ते विद्यमान आहेत म्हणून गृहीत धरले जाणार नाही, तर केवळ 'विजयी क्षमता' (Winnability) आणि लोकाभिमुख कार्य हाच एकमेव निकष असणार आहे.
डॅमेज कंट्रोल आणि नवीन चेहऱ्यांना संधी: गेल्या काही काळापासून स्थानिक पातळीवर आमदारांच्या विरोधात वाढलेला रोष आणि विरोधकांचे 'पीडीए' (PDA) समीकरण याला तोंड देण्यासाठी भाजपने हा मोठा डॅमेज कंट्रोल प्लॅन तयार केला आहे. ज्या आमदारांवविरोधात तीव्र अँटी-इनकंबेंसी आहे, त्यांचे तिकीट कापून त्या जागी नवीन, तरुण आणि अभ्यासू चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे आमदारांमध्ये खळबळ उडाली असून, प्रत्येकाला आपली कामगिरी सुधारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात हॅटट्रिक ण्यासाठी भाजप कोणत्याही प्रकारच्या आत्मसंतुष्टतेला थारा देण्याच्या मनस्थितीत नाही, हे या ताज्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.
शहर
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय! घरकुलांसाठी ८६३ भूमिहीनांना मिळाली जागा, १४ हजारांवर जणांना आधारकार्डचे वितरण; जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!

























Subscribe to my channel




