अमरावती: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या १७ वर्षीय युवा महिला आर्चरी (तिरंदाजी) खेळाडू कुमकुम मोहोड हिने जपानच्या भूमीवर सुवर्ण इतिहास रचला आहे. अमरावतीमधील साध्या बांबूच्या कामठ्यांपासून बनवलेल्या धनुष्यावरून सुरू झालेला कुमकुमचा खडतर प्रवास आज थेट आशियाई सुवर्णपदकापर्यंत पोहोचला आहे. महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी कुमकुम ही भारताची आजवरची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या ऐतिहासिक विजयासह तिने तब्बल ४८ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला आहे. तसेच या विजयामुळे कुमकुमाने २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेचे आपले तिकीटही पक्के केले आहे.
अटीतटीचा सामना आणि थरारक 'शूट-ऑफ': सुवर्णपदकासाठी दक्षिण कोरियाची दिग्गज आणि अनुभवी खेळाडू ओह येजिन हिच्यासोबत कुमकुमची अत्यंत चुरशीची आणि धडधड वाढवणारी अंतिम लढत झाली. सामन्याची सुरुवात कुमकुमसाठी फारशी अनुकूल राहिली नाही. सुरुवातीच्या दोन सेट झाल्यानंतर कुमकुम ३-१ अशा फरकाने पिछाडीवर होती. पहिला सेट कोरियन खेळाडूने जिंकला, तर दुसरा सेट बरोबरीत सुटला. मात्र, १७ वर्षीय कुमकुमने हार मानली नाही आणि आपल्यातील खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवत तिसऱ्या सेटमध्ये सलग तीन अचूक निशाणे साधत ३०-२९ च्या फरकाने सेट आपल्या नावावर केला आणि सामना ३-३ असा बरोबरीत आणला. चौथ्या सेटमध्ये एका छोट्या चुकीमुळे कुमकुम पुन्हा ३-५ अशी पिछाडीवर पडली.
आता सुवर्णपदकासाठी तिला पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणे अनिवार्य होते. शेवटच्या सेटमध्ये कुमकुमने अभूतपूर्व खेळ करत 'परफेक्ट १०' चा स्कोर केला. त्यामुळे अत्यंत चुरशीचा हा सामना ५-५ अशा बरोबरीत सुटला आणि सामन्याचा निकाल लावण्यासाठी तो 'शूट-ऑफ'मध्ये गेला. शूट-ऑफमध्ये प्रत्येक खेळाडूला अचूक लक्ष्यासाठी एकच संधी मिळाली. यात दक्षिण कोरियाची खेळाडू केवळ ८ गुण मिळवू शकली, तर कुमकुम मोहोडने पुन्हा एकदा अत्यंत संयमाने 'परफेक्ट १०' गुण टिपत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. चालू स्पर्धेत कुमकुमचे हे दुसरे सुवर्णपदक आणि एकूण तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी तिने अंकिता भगत आणि किर्ती शर्मा यांच्यासह महिला रिकर्व्ह संघ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, तर २ ऑक्टोबर रोजी मिश्र रिकर्व्ह प्रकारात पदक पटकावले होते.
बांबूच्या धनुष्यापासून ते आशियाई पोडियमपर्यंतचा संघर्षमय प्रवास: अमरावती शहरातील गोसावी कॉलनीत राहणाऱ्या कुमकुम अनिल मनोहर मोहोड हिची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सामान्य आणि हलाखीची आहे. तिचे वडील अनिल मोहोड हे घरीच मिठाईचे रिकामे खोके (पुठ्ठ्याचे बॉक्स) बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात, तर आई रुपाली या गृहिणी आहेत. २०१८ मध्ये एका कार्यक्रमात उन्नत राऊत नावाच्या मुलीच्या माध्यमातून तिला तिरंदाजीची ओळख झाली. चौथीत शिकणाऱ्या कुमकुमने घरी येऊन तिरंदाजी शिकण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर वडील तिला घराशेजारील प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांच्याकडे घेऊन गेले.
दरम्यानच्या काळात कोरोना महामारीचे मोठे संकट आले आणि कुमकुमची महत्त्वाची दोन वर्षे वाया गेली. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे अशक्य होते आणि आधुनिक, महागडे धनुष्य-बाण खरेदी करण्याची कुटुंबाची आर्थिक सुबत्ता नव्हती. परंतु, कुमकुमची प्रचंड जिद्द आणि खेळावरील निष्ठा कमी झाली नाही. तिने चक्क बांबूच्या कामठ्यांपासून बनवलेल्या साध्या धनुष्यावरून घरातच तिरंदाजीचे कठीण धडे गिरवले. २०२३ मध्ये अमरावतीत 'खेलो इंडिया' केंद्र सुरू झाल्यानंतर तिने तिथे नियमित सराव सुरू केला, जिथे तिला प्रशिक्षक गिरीश कुकडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावर्षी आपल्या पहिल्याच सीनियर हंगामात शांघाय आणि अंताल्या येथील वर्ल्ड कपमध्ये सलग दोन सुवर्णपदके जिंकल्यानंतर, कुमकुमने आशियाई क्रीडा स्पर्धेतही ही सोनेरी परंपरा कायम राखली. लेकीच्या या ऐतिहासिक यशामुळे अमरावतीसह संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पसरले असून, आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत. कुमकुम अमरावतीत परतल्यावर तिचे जोरदार स्वागत आणि भव्य मिरवणूक काढण्याची तयारी शहरवासीयांनी केली आहे.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
महाराष्ट्र
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




