गेल्या आठवड्यात सोमवार ते बुधवारदरम्यान हजारो किलोमीटर अंतरावरील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना घडल्या. एक मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये तर दुसरी जपानच्या क्यूशू बेटावर. भोपाळला मान्सूनचे दाट ढग जमले होते, ज्यात जपानमधील चिंताग्रस्त वातावरणाची झलक दिसत होती. “किसान क्रांती यात्रे’अंतर्गत शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भोपाळचा मुख्य रस्ता पूर्णपणे जाम झाला होता. अचानक शाळा बंद झाल्या. पालक त्रस्त होते. गुदमरून टाकणाऱ्या उकाड्याने प्रत्येक कारचालक हैराण होता. होशंगाबादचा मुख्य रस्ता पूर्ण बंद होता. कुणाला बिझनेस प्रेझेंटेशन द्यायचे होते, तर कुणाला वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी घरी पोहोचायचे होते. पण कुणीही एक इंचही पुढे सरकू शकले नाही. अनेक जण फोनवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये अडकले होते. काही जण स्टिअरिंगवर हात आपटून सतत हॉर्न वाजवत होते. काहींसाठी ही परिस्थिती असह्य असल्याने ते खिडकीच्या काचा खाली करून ट्रॅफिक जामला शिव्याशाप देऊ लागले. काहींनी जवळच्या छोट्या गल्ल्यांत घुसून भोपाळ-जबलपूर महामार्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण या प्रक्रियेत त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत होऊ शकणारी वाहतूकही रोखली. मोठी वाहने त्या गल्ल्यांत वळू शकत नसल्याने दुचाकीही अडकल्या. मीही त्याच ट्रॅफिक जाममध्ये होतो. अनेकांनी कारचालकांना संयम राखण्याचे आवाहन केले. पण सर्वांनाच लवकर घरी पोहोचायचे होते. या गोंधळात कुणीही वेळेवर पोहोचले नाही. या अधीरतेचा परिणाम असा झाला की काही लोकांना मित्र किंवा नातेवाइकांच्या घरी रात्र काढावी लागली, वास्तविक पाहता भोपाळ हे दिल्लीपेक्षा खूपच लहान शहर आहे. गेल्या मंगळवारी नेमक्या याच वेळी जपानच्या दक्षिणेकडील बेटावर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. 1500 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले, त्यापैकी 179 पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. अनेकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. सुमारे 80 हजार घरे पाणी आणि विजेशिवाय होती. अनेक जण 24 ते 48 तास झोपले नाहीत. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, ते चिंतेत होते. संकटावेळी माणसाची प्रवृत्ती असते की तो गोंधळून माहिती मिळवण्यासाठी ओरडतो, पुढे जाऊन समस्या कशी सोडवली जाऊ शकते, हे पाहतो. तो आपल्या कुटुंबासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण बेटावरील त्या उद्ध्वस्त भागातही अनेक लोक अन्न-पाण्यासाठी रांगेत उभे नव्हते, तर ज्यांची घरे पूर्णपणे तुटली होती किंवा जे भुकेले होते, त्यांच्यापर्यंत स्वयंसेवक म्हणून अन्न-पाणी पोहोचवण्यासाठी उभे होते. रांगेत उभ्या अनेकांच्या पायात वेदना होत होत्या. त्यांना त्यांच्या बुटांखाली अजूनही भूकंपाचे धक्के जाणवत होते, पण तरीही ते आपल्या जागी उभे राहिले. हेच त्याच्या सर्वात शुद्ध स्वरूपात “गामन’ होते. “गामन’ ही एक प्रमुख जपानी सांस्कृतिक संकल्पना आहे. याचा अर्थ - सामाजिक सलोखा राखण्यासाठी आपल्या वैयक्तिक वेदना, राग किंवा तक्रारी लपवून ठेवणे. नैसर्गिक आपत्ती, अडचणी किंवा दुःखांचा शांततेने आणि धैर्याने सामना करणे. समाज आणि राष्ट्राच्या गरजांना आपल्या वैयक्तिक दुःखापेक्षा वर ठेवणे. कुठेतरी आपण सगळे असेच लहानाचे मोठे झालो आहोत की आपल्याला त्वरित समाधान हवे असते किंवा याला “टू मिनिट्स नूडल्स जनरेशन’ असेही म्हणता येईल. पण आपण आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना “गामन’चे हे धडे नक्की शिकवले पाहिजेत. यामुळे त्यांची चिंता कमी होण्यास मदत होईल आणि ते आणीबाणीच्या परिस्थितीतही शांत राहायला शिकतील.
फंडा असा की, जेव्हा पायाभूत सुविधा कोलमडतात किंवा समाज थांबतो, तेव्हा खरी ताकद यावरून मोजली जात नाही की तुम्ही आणि मी किती लवकर घरी पोहोचलो. ती त्या शांत क्षणांमध्ये दिसून येते, जेव्हा आपल्यासारखे सामान्य लोक घाबरून जाण्याऐवजी संयम आणि वैयक्तिक निराशेपलीकडे जाऊन सामूहिक जबाबदारी निवडतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



