पुणे: पोलिसांच्या विश्रामबाग पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या एका अत्यंत हुशार आणि आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, हे चोरटे आपली ओळख लपवण्यासाठी घरफोडी करताना डोक्यावर विग आणि तोंडावर मास्क वापरत होते. सुमारे सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या टोळीतील चार जणांना उंड्री-पिसोळी येथील डोंगराळ भागात सापळा रचून अटक करण्यात आली आहे.
घटनेचा सविस्तर तपशील: अटक केलेल्या आरोपींची नावे शंकरसिंग उर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी (२७, रा. रामटेकडी, हडपसर), रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगर (२६, बडोदा, गुजरात), अक्षयसिंग उर्फ अक्षय बिरुसिंग जुनी (२२, रा. हडपसर) आणि सोनुसिंग शाखासिंग शिकलीगर (२२, बडोदा, गुजरात) अशी आहेत.
या टोळीचा मुख्य सूत्रधार शंकरसिंग हा एक सराईत गुन्हेगार आहे. घरफोडी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपली ओळख पटू नये, म्हणून त्याने डोक्यावर विग लावण्याची आणि चेहऱ्यावर मास्क घालण्याची अनोखी शक्कल लढवली होती. त्याच्या या वेशातील व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. या टोळीने विश्रामबाग, विश्रांतवाडी, काळेपडळ आणि दत्तवाडी परिसरात तब्बल नऊ घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना माहिती मिळाली की, ही टोळी उंड्री-पिसोळी परिसरात वास्तव्यास आहे. पोलीस पथकाने या परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले आणि ते कारने डोंगराळ रस्त्यावरून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पकडले. त्यांच्याकडून ३७ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींची योजना हा मुद्देमाल गुजरातला नेण्याची होती, परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचा डाव उधळला गेला.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



