महाराष्ट्रात 255 मराठी शाळा बंद झाल्याची आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे. मुंबईत गेल्या दहा वर्षांत शंभरहून अधिक शाळा कमी झाल्या असून, 57 शाळा धोक्यात असल्याचे चित्र आहे. मात्र, इंग्रजी शाळा वाढल्या म्हणून मराठी शाळा संपल्या, हा निष्कर्ष सोपा असला तरी तो अर्धवट आहे. शिक्षण क्षेत्रातही मागणी आणि पुरवठा यांचेच गणित लागू होते. पालक तिथेच जातात जिथे त्यांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित वाटते. जर दुसरी रेघ छोटी करायची असेल तर तिच्या शेजारी मोठी रेघ आखावी लागते; ती पुसून टाकून उपयोग होत नाही. म्हणून इंग्रजी माध्यमाला दोष देण्याऐवजी मराठी शाळांना अधिक सक्षम, आधुनिक आणि विश्वासार्ह बनवणे हाच मार्ग आहे. मी स्वतः इंग्रजी माध्यमाची शाळा चालवतो, मग मी मराठी शाळांच्या भवितव्यावर का भाष्य करतोय, असा प्रश्न काहींना पडू शकतो. परंतु, शिक्षण ही केवळ दोन माध्यमांमधील स्पर्धा नसून, ती समाजाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक आरोग्याशी जोडलेली बाब आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकाणू समितीचा सदस्य आणि दोन दशकांचा शैक्षणिक अनुभव असलेला अभ्यासक म्हणून या प्रश्नाकडे पाहताना मला त्यात भाषेचा संघर्ष दिसत नाही; मला व्यवस्थेतील उणिवा आणि सुधारण्याची संधी दिसते. ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही; देशभरातील प्रादेशिक भाषांमधील शाळा अशाच आव्हानांना सामोऱ्या जात आहेत. नागपूर खंडपीठाने स्थानिक भाषांतील शाळांसाठी ठोस धोरणात्मक आराखडा सादर करण्याची गरज व्यक्त केली आहे. घटती पटसंख्या, शिक्षकांची कमतरता आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. पालकांचा विश्वास ढासळला की ते पर्याय शोधतात—ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरण मातृभाषेत शिक्षणावर भर देते, कारण प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाल्यास मुलांचा संकल्पनात्मक पाया भक्कम होतो, हे संशोधनाने सिद्ध केले आहे. परंतु, मातृभाषा टिकवायची असेल तर आधुनिकतेची जोड द्यावी लागेल. मराठी शाळांनी स्टेम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंग्रजी संभाषण कौशल्य यांचा समन्वय साधत आपली गुणवत्ता सिद्ध करावी. दर महिन्याला ‘ओपन क्लास डे’ घेऊन पालकांना प्रत्यक्ष अध्यापन दाखवणे, कमी पटसंख्या असलेल्या शाळांना सुधारण्यासाठी वेळ आणि आर्थिक पाठबळ देणे आणि पायाभूत सुविधांमध्ये ठोस गुंतवणूक करणे ही तातडीची पावले आहेत. सीएसआरद्वारे शाळांच्या पायाभूत सुविधा सुधारणे तसेच दीर्घकालीन पातळीवर अर्ली वॉर्निंग डॅशबोर्ड, पारदर्शक डेटा आणि शाळा बंद करण्यापूर्वी पालक सुनावणी व संक्रमण योजना बंधनकारक करणे आवश्यक आहे. दरवर्षी जिल्हानिहाय श्वेतपत्रिका प्रकाशित करून जबाबदारी निश्चित करता येईल. आजचा प्रश्न असा नाही की, कोणती भाषा जिंकते. प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, पालकांचा विश्वास आणि शिक्षणाची गुणवत्ता जिंकते का? दोषारोपांनी शाळा वाचत नाहीत; त्या वाचतात योग्य डेटा, स्पष्ट धोरण आणि प्रामाणिक कृतीमुळे. मराठी शाळा टिकवण्याचा आराखडा हा भाषा, गुणवत्ता, अर्थसहाय्य, द्विभाषिक कौशल्य आणि पालकांचा विश्वास या पाच स्तंभांवर उभा राहायला हवा. आणि तो उभारण्यासाठी आज काम करणे आवश्यक आहे. आज आपण ठोस पावले उचलली नाहीत, तर उद्या इतिहास आपल्याला माफ करणार नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.) तरीही मराठी शाळा संपल्या हा निष्कर्ष अर्धवटशिक्षण ही केवळ कोणत्या माध्यमातून मुले शिकतात, यातील स्पर्धा नाही; तोसमाजाची जडणघडण व बौद्धिक आणि सांस्कृतिक आरोग्याशी जोडलेला मुद्दा आहे. याच दृष्टीने त्याच्याकडे पाहणेदेखील आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



