8 मार्च 1908 साली अमेरिकेतील वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी ऐतिहासिक निदर्शने केली होती. कामाचे तास कमी करणे, कामाच्या जागी सुरक्षितता आणि सर्व स्त्री व पुरुष यांना मतदानाचा हक्क या मागण्यांसाठी त्या आग्रही राहिल्या. त्यांनी दिलेली ‘ब्रेड अँड रोसेस’ ही घोषणा गाजली. पोटासाठी भाकरी आणि आयुष्यासाठी सन्मान अशा व्यापक अर्थाची ती घोषणा होती. क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती या अमेरिकन कामगार स्त्री संघर्षामुळे प्रभावित झाली. 1910 साली कोपेनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत 8 मार्च हा दिवस अमेरिकन महिला कामगारांच्या संघर्षाच्या स्मरणार्थ ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव तिने मांडला व तो पारित झाला. भारतात मुंबई येथे 8 मार्च 1943 रोजी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी जागतिक महिला दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, पण स्त्रियांना कायमच सन्मानाने आणि सुरक्षित जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रोजच महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत. जातीवादातून संघर्ष झाला तरी महिलांना वेठीस धरले जाते व त्यांच्यावर अत्याचार केले जातात, याचे उदाहरण म्हणजे मणिपूर येथील घटना. दोन समाजांतील संघर्षामध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाले आहेत. कोलकाता येथील एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या केली, अशा अनेक घटना आपण ऐकतो आणि हळहळ व्यक्त करतो आणि काळ जातो तसा त्या घटनेची तीव्रता संपते. ही विकृती कधी संपणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो, कारण महिला घराबाहेरच नाही तर त्यांच्या घरात सुद्धा सुरक्षित नाहीत. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. संगमनेरस्थित लोकपंचायत संस्थेच्या माध्यमातून अकोले व संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये महिलांसोबत करत असलेल्या कामातून कौटुंबिक हिंसाचाराची, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध, संशय, मूल होत नाही किंवा मुलगा होत नाही, पैशाची मागणी ही कारणे समोर आली आहेत. हा हिंसाचार पोसण्यामागे माहेरची माणसे हातभार लावत असतात. कौटुंबिक छळ होत आहे हे माहिती असूनही तिला आधार न देता, सासरीच नांदण्यासाठीचा आग्रह ही माणसे करतात. ग्रामीण भागात हिंसाचारग्रस्त महिलांसाठी काम करत असताना समाजातील या वास्तवाची जाणीव होते. स्त्री घरातून परवानगी नसेल तर घराच्या बाहेर पडू शकत नाही. ज्या गावांमध्ये आम्ही काम करतो तिथे त्या महिलांसोबत बैठक घ्यायची असेल तर जनावरांचा चारा, शेतातील काम, स्वयंपाक, धुणे-भांडी अशी सर्व कामे केल्याशिवाय त्या बाहेर पडत नाहीत. काही महिला तर मजुरीसाठी बाहेरगावी जातात; 3 वाजता उठून स्वयंपाक करून 5 वाजता निघतात, तर संध्याकाळी 8 वाजता घरी येतात. काही अनुभव असेही आहेत की, उच्च शिक्षण घेतलेल्या मुलीही नवऱ्याने कितीही मारले, तिथे प्रेम नाही, तरी सासरीच नांदायचे आहे असा अट्टाहास करताना दिसतात; कारण माहेरी राहिली तर तिची समाजात अवहेलना होते. गावात भाऊबंदकीत किंवा शेजारी काही वाद झाला तर त्या घरातील स्त्रीने त्यामध्ये भाग घेऊ नये, तिला बोलू दिले जात नाही. या सर्व मानसिकता घडवण्याचा व तिलाच त्याचा वाहक बनवणाऱ्या या पुरुषप्रधान समाजाने महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, महिला दिनासारखे ‘इव्हेंट’ असे भास निर्माण केले आहेत. हे भास जेव्हा मिटतील तेव्हा प्रत्येक दिवस महिला सन्मानाने आणि निर्भीडपणे जगतील, लिंगभेद न करणारी न्यायव्यवस्था प्रस्थापित होईल, तेव्हा 8 मार्च हा एक दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची गरज पडणार नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.) आजही स्त्री कौटुंबिक हिंसाचारामुळे पोळलेलीसासर व माहेरच्या हिंसाचक्रात महिला अडकलेल्या आहेत. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्यासोबत कोणीही उभे रहात नाही. अशा स्थितीत त्या तणावामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी; तुकाराम मुंढेंचे नवे नियम कुणाला लागू होणार?
कोथरूडमध्ये भरधाव कारची दुचाकींना धडक! नागरिकांनी चालकाला पकडलं
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची फडणवीसांकडे मोठी मागणी; दिवाळीपूर्वी हेक्टरी ₹१ लाख मदत द्या!
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




