जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर: किश्तवाड जिल्ह्यातील डच्छन भागात एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी डांगदरू येथून साउंडरकडे जाणारी एक कार अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली आणि थेट चिनाब नदीपात्रात जाऊन पडली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात सकाळी ९:३० ते १०:४५ च्या सुमारास डच्छन येथील टेंडर नाला भागात झाला. कार डांगदरूवरून साउंडरच्या दिशेने जात होती. यैनवानजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळली आणि चिनाब नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली.

अपघाताची माहिती मिळताच डच्छन पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थ क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचले अन् त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाने आतापर्यंत ५ जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत.
अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण किती प्रवासी प्रवास करत होते, याबाबत अजूनही अधिकृतपणे कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलीस या अपघाताच्या कारणांचा शोध घेत असून गाडीतील प्रवाशांची संख्या आणि मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *