नवी दिल्ली: भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे आणि अनिवार्य ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड (Aadhaar Card). लहान मुलांच्या शाळा प्रवेशापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा नोकरीच्या ठिकाणी ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड सर्वत्र आवश्यक असते. अनेकदा नोकरीनिमित्त किंवा इतर कारणांमुळे राहण्याचे ठिकाण बदलल्यास आधार कार्डवरील पत्ता अपडेट करणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, पूर्वी यासाठी लोकांना लांबच लांब रांगा लावून आधार केंद्रांवर जावे लागत असे. आता मात्र युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नागरिकांची ही मोठी कटकट दूर केली असून, आधार कार्डातील पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे.
युआयडीएआयच्या (UIDAI) नवीन आणि आधुनिक 'आधार अॅप' (Aadhaar App) मुळे आता आधार कार्डातील पत्ता घरबसल्या अगदी काही मिनिटांत अपडेट करता येणे शक्य झाले आहे. यासाठी नागरिकांना आता कोणत्याही आधार केंद्रावर जाण्याची गरज उरलेली नाही. नवीन अॅपच्या माध्यमातून ही डिजिटल प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यात आली आहे.
घरबसल्या पत्ता अपडेट करण्याची सोपी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया:
१. अॅप डाउनलोड आणि लॉगिन: सर्वात पहले तुमच्या स्मार्टफोनवर UIDAI चे अधिकृत नवीन 'Aadhaar App' डाउनलोड करा. त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाच्या मदतीने त्यात लॉगिन करा.
२. पत्ता अपडेट पर्याय निवडा: अॅपमध्ये गेल्यानंतर 'Update Aadhaar' या पर्यायावर क्लिक करून पत्ता बदलाचा पर्याय निवडा. यामध्ये दोन मुख्य पर्याय मिळतात:
पहिल्या पर्यायामध्ये नवीन पत्त्याचा कायदेशीर पुरावा (Address Proof जसे की पासपोर्ट, बँक पासबुक, वीज बिल, पाणी बिल किंवा मतदार ओळखपत्र) स्कॅन करून अपलोड करावा लागतो.
दुसऱ्या पर्यायामध्ये कुटुंबातील सदस्याच्या (Family Member) आधार कार्डच्या संमतीने आणि मदतीने देखील पत्ता सहज अपडेट करता येतो.
३. कागदपत्रे आणि फेस ऑथेंटिकेशन: आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अॅपद्वारे युजर्सचे 'फेस ऑथेंटिकेशन' (Face Authentication) पूर्ण केले जाते, जे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित मानले जाते.
४. शुल्क आणि SRN क्रमांक: ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने ७५ रुपये इतके सेवा शुल्क भरावे लागते. यशस्वी पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक 'Service Request Number' (SRN) मिळतो.
५. स्टेटस तपासणी: या SRN क्रमांकाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती (Status) घरबसल्या ऑनलाइन कधीही तपासू शकता.
UIDAI कडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व कागदपत्रे आणि माहिती योग्य असल्यास साधारणपणे १५ दिवसांच्या आत आधार कार्डमधील पत्ता यशस्वीरित्या अपडेट केला जातो. ज्या नागरिकांनी नुकतेच आपले घर किंवा शहर बदलले आहे, त्यांच्यासाठी ही नवीन डिजिटल सुविधा एक मोठा दिलासा देणारी ठरेल.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




