उत्तर प्रदेश: सर्वांसमोर आनंदी आणि उत्साही राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि खासगी आयुष्यात तो कोणत्या मानसिक व कौटुंबिक संकटांचा सामना करत आहे, याचा अंदाज बांधणे अनेकदा कठीण होते. काहीही न बोलता अचानक समोर येणाऱ्या अशा व्यक्तीबद्दल एके दिवशी अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातून अशीच एक मन हेलावून टाकणारी आणि थरारक घटना समोर आली आहे, जिथे एका ५२ वर्षीय व्यक्तीने स्वतःला गोळ्या झाडून आपले जीवन संपवले आहे.
मृत व्यक्तीची ओळख देवदत्त शर्मा अशी पटली असून, ते एका महाविद्यालयात लिपिक (क्लर्क) म्हणून काम करत होते आणि सोबतच आपल्या घरामागे असलेली 'रॉक जिम' देखील चालवत होते. ते एक बॉडी बिल्डर देखील होते. देवदत्त शर्मा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरमृत्यूपरीक्षणासाठी (पोस्टमॉर्टमसाठी) पाठवला असून सहाय्यक सर्कल अधिकारी पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी देवदत्त शर्मा यांनी त्यांची २१ वर्षीय भाची नेहा शर्मा हिच्या मोबाईलवर एक अत्यंत सविस्तर आणि धक्कादायक मेसेज (सुसाइड नोट) पाठवला होता. या मेसेजमध्ये त्यांनी गेल्या काही काळापासून आपल्याला मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची भावना व्यक्त केली होती.
त्यांनी मेसेजमध्ये लिहिलं होतं की, "हा अपमान आता माझ्या सहन होण्यापलिकडे गेला आहे आणि सतत मरत जगण्यापेक्षा मी एकदाच माझे आयुष्य संपवत आहे..." या सुसाइड नोटमधील मजकुराने सर्वांनाच चक्कीत केले आहे. देवदत्त शर्मा यांनी आपल्या मेसेजमध्ये काही अत्यंत कडक आणि अंतिम इच्छा देखील व्यक्त केल्या होत्या. त्यांनी लिहिले होते की, "माझ्या बायकोने माझ्या मृतदेहाला हात देखील लावू नये. अंतिमसंस्कारासाठी जास्त खर्च करू नका, तसेच माझ्या आत्म्याच्या शांतीसाठी कोणतीही धार्मिक विधी किंवा पूजा करण्याची गरज नाही." एवढेच नव्हे तर, आपला आत्मा भटकत राहावा, अशी संतापजनक इच्छाही त्यांनी त्यामध्ये व्यक्त केली होती. तसेच, त्यांनी आपल्या भाचीला त्यांच्या आईची काळजी घेण्याची विनंती केली होती.
या अंगावर काटा आणणाऱ्या सुसाइड नोटची माहिती समोर आल्यानंतर मृतकाच्या कुटुंबियांमध्ये तीव्र शोककळा पसरली असून नातेवाईकही हादरले आहेत. पोलीस आता या मोबाईल मेसेजला तपासाचा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानून कौटुंबिक कलह, वैवाहिक वाद किंवा इतर सर्व संभाव्य बाजूंनी कसून तपास करत आहेत.
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!


























Subscribe to my channel




