अमरावती (वरुड):
अमरावती जिल्ह्यातून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कोणा मुलाची वाईट नजर पडू नये, या विचित्र समजातून तिच्याच आई-वडिलांनी तिचे सर्व केस कापून तिला टक्कल केले आणि घरात कोंडून ठेवले. याप्रकरणी वरुड पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून जन्मदात्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १० वी-१२ वीच्या दरम्यानचे शिक्षण घेत आहे. एका मुलाचा तिच्यावर डोळा असून तो तिचा पाठलाग करतो, असा संशय तिच्या पालकांना होता. पालकांनी मुलीला त्या मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यास सांगितले होते, मात्र मुलीने भीतीपोटी किंवा अन्य कारणाने तक्रार देण्यास नकार दिला.
पालकांचा अघोरी निर्णय:
मुलीचे केस आणि तिचे सौंदर्य पाहून मुले तिच्याकडे आकर्षित होतात, असा अजब आणि विकृत तर्क पालकांनी लावला. यानंतर त्यांनी मुलीचा विरोध धुडकावून तिचे पूर्ण केस कापले आणि तिला विद्रुप करून घरात बसवले. इतकेच नाही तर तिला मानसिक आणि शारीरिक छळही सहन करावा लागला.
मुलीची धाडसी पाऊल:
आपल्याच आई-वडिलांकडून होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध मुलीने हिंमत दाखवली. तिने थेट वरुड पोलीस स्टेशन गाठले आणि आपबीती सांगितली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आई आणि वडील या दोघांवरही विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
सद्यस्थिती:
सध्या पोलिसांनी पीडित मुलीला सुरक्षिततेसाठी महिला व बालविकास विभागाच्या शासकीय निरीक्षणगृहात (बालगृहात) पाठवले आहे. ज्या पालकांनी तिचे संरक्षण करायला हवे होते, त्यांनीच केलेल्या या अघोरी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्या मुलाचाही शोध घेत आहेत ज्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडला.
शहर
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- पुणे: रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! लोणावळा-कर्जत मार्गावरील दुसरी मार्गिका पूर्ववत; 'डेक्कन क्वीन' आजपासून पुन्हा रुळावर.
- मुंबई: पोलीस म्हणाले ‘समुद्रात जाऊ नका’तरीही दुर्लक्ष; अर्नाळा बीचवर नालासोपाऱ्यातील चार मुलांचा बुडून मृत्यू
- पुणे: आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; खलील शेख यांचा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल.
महाराष्ट्र
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- पुणे: रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! लोणावळा-कर्जत मार्गावरील दुसरी मार्गिका पूर्ववत; 'डेक्कन क्वीन' आजपासून पुन्हा रुळावर.
- मुंबई: पोलीस म्हणाले ‘समुद्रात जाऊ नका’तरीही दुर्लक्ष; अर्नाळा बीचवर नालासोपाऱ्यातील चार मुलांचा बुडून मृत्यू
- पुणे: आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; खलील शेख यांचा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल.
गुन्हा
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
- वर्धा: १२ वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; लैंगिक अत्याचारानंतर खूनाचा संशय, परिसर हादरला
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




