अमरावती: अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कालीमाता नगर परिसरातून एक अत्यंत वेदनादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे.
जन्मानंतर अवघ्या पाचच दिवसांत एका निष्पाप नवजात बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, बालिकेच्या मृत्यूची कोणतीही माहिती पोलिसांना न देता कुटुंबीयांनी घाईघाईत तिच्यावर अंत्यसंस्कार करत मृतदेह जमिनीत दफन केला होता. मात्र, पोलिसांना या प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन (Postmortem) केले. या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर पोलिसांनी नवजात बालिकेच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भीषण उन्हामुळे जीव गुदमरून झाला मृत्यूपोलिसांनी दिलेल्या आणि शवविच्छेदन अहवालातून (Postmortem Report) समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या विदर्भासह अमरावतीत उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. या कडक उन्हाचा फटका या पाच दिवसांच्या चिमुकलीला बसला. अत्यंत कडक ऊन आणि उष्णतेमुळे या नवजात बालिकेचा श्वास कोंडला आणि जीव गुदमरून तिचा जागीच मृत्यू झाला. नवजात बालकांची त्वचा आणि शरीर अत्यंत नाजूक असल्याने ते वातावरणातील हा अचानक झालेला बदल आणि वाढलेले तापमान सहन करू शकले नाही.
गुपचूप अंत्यसंस्कार आणि पोलिसांचा संशयबालिकेचा मृत्यू झाल्यानंतर पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता किंवा कोणालाही न सांगता कालिमाता नगर परिसरातील स्मशानभूमीत तिचा मृतदेह जमिनीत पुरून टाकला. मात्र, या संशयास्पद मृत्यूची गुप्त माहिती बडनेरा पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत दफन केलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखलशवविच्छेदन अहवालात बालिकेचा मृत्यू उन्हामुळे जीव गुदमरून झाल्याचे आणि तिच्या संगोपनात कमालीचा हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले. नवजात बालकाची काळजी घेण्यात हलगर्जीपणा करणे, त्याच्या जिवाला धोका निर्माण करणे आणि मृत्यूची माहिती लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या कारणास्तव बडनेरा पोलिसांनी अखेर बालिकेच्या आई आणि वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.
शहर
- पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
- छत्रपती संभाजीनगर: एफडीएचा दणका; अस्वच्छता अन् धोकादायक पुनर्वापर केलेल्या तेलामुळे प्रसिद्ध 'उत्तम उपहारगृह'चा परवाना तडकाफडकी निलंबित
महाराष्ट्र
- पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!
- गोंदिया: लाडक्या भावाच्या निधनाचा तीव्र धक्का सहन न झाल्याने बहिणीचाही मृत्यू; एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
गुन्हा
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य


























Subscribe to my channel



