
Satara : महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) सातारा जिल्ह्यात केलेल्या कारवाईत तब्बल 6000 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी या गावातील मोकळ्या पोल्ट्री शेडवर तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली असता त्या ठिकाणी ड्रग्ज निर्मितीची फॅक्टरीच उघडकीस आली. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून बिहारी तरुणांकडून ड्रग्ज निर्मिती करून घेतली जात होती, असे समजते.
कराड तालुक्यातील डोंगरी भागात पाचुपतेवाडी हे गाव आहे. कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचुपतेवाडी गावामध्ये एमडी ड्रग्ज तयार करणारी फॅक्टरीच सुरू होती. गावापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या पोल्ट्री शेडमध्ये ड्रग्ज निर्मिती केली जात होती. याबद्दल मिळालेल्या माहितीवरून डीआरआयच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने शनिवारी सायंकाळी धाड टाकली.
|
|
शेडमध्ये एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त करण्यात आला. तसेच संशयितांना ताब्यात घेऊन पोल्ट्री शेड सील करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत सहा हजार कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेकॉर्डवरील एका अट्टल गुन्हेगाराने काही बिहारी तरूणांना हाताशी धरून रिकाम्या पोल्ट्री शेडमध्ये अंमली पदार्थांचे उत्पादन सुरू केले होते. पत्र्याच्या शेडला बाजूने लोखंडी जाळी आहे. शेडमध्ये काय चाललंय हे बाहेरून दिसू नये म्हणून जाळीला प्लास्टिकचा कागद बांधण्यात आला आहे. शेडमध्ये अत्यंत गुप्तपणे ड्रग्ज निर्मिती केली जात होती. घटनेपासून काही अंतरावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे दूरक्षेत्र आहे. मात्र, स्थानिक पोलिसांना त्याचा कसलाही सुगावा नव्हता. डीआरआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकून ड्रग्ज निर्मितीची फॅक्टरी उध्वस्त केली. या कारवाईची माहिती देखील सातारा जिल्हा पोलीस अथवा कराड ग्रामीण पोलिसांना नव्हती.
सध्या महसूल गुप्तचर संचालनालयाकडून (डीआरआय) या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या ड्रग्ज निर्मिती रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का? हे तपासात स्पष्ट होईल मात्र, या धडक कारवाईमुळे ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांना देखील या कारवाईने मोठी चपराक बसली आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी किरकोळ कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेतात. परंतु, अंमली पदार्थ निर्मितीची फॅक्टरी सुरू असल्याचा सुगावा त्यांना लागला नाही. यावरून सातारा पोलीस दल सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
यासंदर्भात कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, कारवाई बद्दल आम्हाला कसलीच कल्पना दिलेली नाही. त्यामुळे कारवाईत नेमकं काय सापडले हे आम्हाला माहीत नाही. तसेच, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी देखील कारवाईबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे एकूणच सातारा जिल्हा पोलीस दलाची नाचक्की झाली आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel





Start sharing, start earning—become our affiliate today!