मुंबई: मान्सूनमध्ये झाडे कोसळून मृत्यूच्या घटना घडत असतानाही बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील ३६ पदे अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे धोकादायक झाडांची तपासणी, फांद्यांची छाटणी आणि असुरक्षित झाडे हटविण्याच्या कामांवर मोठा परिणाम होत आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर मनपाच्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची मागणी केली आहे.
२२ जून ते १७ जुलै या कालावधीत मुंबईतील सार्वजनिक तसेच खासगी जागांवर ९०२ झाडे उन्मळून पडली, तर १,२५१ फांद्या कोसळल्या. या दुर्दैवी दुर्घटनांमध्ये तिघांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, धोकादायक झाडांची ओळख पटवणे, फांद्यांची छाटणी करणे व असुरक्षित झाडे हटविण्याची मुख्य जबाबदारी असलेला उद्यान विभाग सध्या तीव्र मनुष्यबळ कमतरतेमुळे अडचणीत सापडला आहे.
हेतल गाला यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, उद्यान सहाय्यक व कनिष्ठ वृक्ष अधिकारी यांच्या मंजूर १०६ पदांपैकी तब्बल ३६ पदे रिक्त आहेत. परिणामी, उद्याने व विरंगुळा मैदानांची देखभाल, मान्सूनपूर्व फांद्यांची छाटणी, झाडांच्या आरोग्याची तपासणी तसेच इतर संबंधित उद्यानविषयक कामांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांतील प्रमुख दुर्घटना:
३० जून: चेंबूरमध्ये रस्त्यालगतचे झाड उन्मळून शाळेच्या बसवर कोसळल्याने ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
५ जुलै: आरे वसाहतीत मोटारसायकलवर झाडाची फांदी पडल्याने १८ वर्षीय हसन रझा जहांगीर आलम सय्यद या तरुणाला प्राण गमवावे लागले.
६ जुलै: कुर्ला पश्चिम येथे दुकानावर झाड कोसळल्याने ६३ वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला.
कामात अडथळे येत असल्याची कबुली:
पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महत्त्वाची वृक्ष व्यवस्थापनाची कामे वेळेत पूर्ण करणे कठीण होत असल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, २२ जून ते १७ जुलैदरम्यान मनपाने सार्वजनिक आणि खासगी जागांवरील ३,८४१ धोकादायक झाडे व फांद्या हटवल्या असून, सध्या ५४२ ठिकाणी ही कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, नागरिकांना एखादी झाड किंवा फांदी धोकादायक स्थितीत आढळल्यास त्याची माहिती त्वरित '१९१६' या मदत क्रमांकावर देण्याचे आवाहन पालिकेकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली उच्च न्यायालय आणि विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

























Subscribe to my channel




