मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सरकारी रुग्णालयांच्या सेवेचा दर्जा अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत 'स्टार रेटिंग प्रणाली' लागू केली आहे. या नव्या व्यवस्थेनुसार आता ग्रामीण ते जिल्हा स्तरावरील सरकारी रुग्णालयांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर ० ते ५ स्टार सार्वजनिक गुणवत्ता मानांकन दिले जाणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या संदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी अधिकृतपणे जारी केला आहे.
या नवीन प्रणालीअंतर्गत रुग्णालयांचे मूल्यांकन एकूण दहा प्रमुख निकषांवर केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सेवेची उपलब्धता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती, आवश्यक औषधांचाक साठा, विविध निदान चाचण्यांची सुविधा, ओपीडी व बेड ऑक्युपन्सी (रुग्णसंख्या व खाटांची उपलब्धता), प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, रुग्णालया परिसरातील स्वच्छता आणि रुग्णांकडून मिळणारा अभिप्राय (फीडबॅक) यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. प्रत्येक निकषासाठी अर्धा स्टार देण्यात येणार असून, सर्व निकष उत्कृष्टपणे पूर्ण करणाऱ्या रुग्णालयाला थेट पाच स्टार मानांकन मिळणार आहे.
मूल्यांकन आणि सत्कार:
रुग्णालयांच्या कामकाजाचा सर्वसमावेशक डेटाबेसच्या आधारे दरवर्षी जानेवारी आणि ऑगस्ट अशा वर्षातून दोन वेळा हे मूल्यांकन केले जाईल. यामध्ये चार किंवा त्यापेक्षा अधिक स्टार मिळविणाऱ्या उत्कृष्ट रुग्णालयांना राज्य सरकारतर्फे विशेष गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या संपूर्ण व्यवस्थेमध्ये ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, सामान्य व स्त्री रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये, तसेच राज्य कामगार विमा रुग्णालये अशा एकूण ६२३ सरकारी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.
रुग्णांसाठी काय बदलणार?
राज्य सरकारच्या मते, या स्टार रेटिंग प्रणालीमुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये एक सकारात्मक स्पर्धात्मकता वाढीस लागेल, सेवेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी जाताना रुग्णालयांच्या कामगिरीची पारदर्शक माहिती सहज उपलब्ध होईल. यामुळे कमी गुण मिळालेल्या रुग्णालयांवर सेवा सुधारण्याचा मोठा दबाव निर्माण होईल, तर चांगली कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांबद्दल लोकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल.
मनुष्यबळाची कमतरता हीच खरी अडचण:
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते कोणतीही रेटिंग प्रणाली यशस्वी आणि प्रभावी ठरण्यासाठी त्याचे मूल्यांकन निष्पक्ष, पारदर्शक व नियमित होणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ गुणांकन देऊन चालणार नाही, तर ग्रामीण भागातील रुग्णालयांच्या उणिवा दूर करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, औषधांचा सुरळीत पुरवठा, आधुनिक उपकरणांची उपलब्धता आणि योग्य आर्थिक पाठबळ मिळाल्यासच या उपक्रमाचे अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसून येतील. सध्या राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत जर मनुष्यबळच अपुरे असेल, तर संबंधित रुग्णालयांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊन ती रुग्णालये रेटींगमध्ये कायम मागे पडण्याची भीतीही वर्तवली जात आहे.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




