Pune : महत्त्वाची बातमी! भीमाशंकर मंदिर ३ महिन्यांसाठी बंद राहणार; नेमकं कारण काय?

Pune : महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे भीमाशंकर मंदिर. आता भीमाशंकर मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद राहणार आहे. हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ठिकाणी हजारो भाविक येतात. जर तुम्हीही भीमाशंकरला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

१ जानेवारीपासू मंदिर राहणार बंद
१ जानेवारीपासून पुढील तीन महिने भिमाशंकर मंदिर बंद राहणार आहे. पुढील वर्ष सुरु होत असल्याने भिमाशंकरला विकास आराखड्यातुन नव्याने विकास कामे होत आहेत.

Pune : राजकारणात मोठा उलटफेर; भरत जाधव यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री, स्थानिक राजकीय समीकरणांना नवं वळण

भिमाशंकर विकास आराखड्यात मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम होणार आहे. हे काम होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मुख्य मंदिर दर्शानासाठी तीन महिने बंद रहाणार आहे. मंदिर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

भिमाशंकरला येणा-या भाविकांची संख्या गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील आठ दिवसात यासाठी प्रशासकिय पातळीवर पाहणी करुन नियोजन केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील कामांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सध्या ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त सलग सुट्ट्या आहे. या सुट्ट्यांमध्ये अनेकजण फिरायला जाण्याचा प्लान करतात. अनेकजण तर भीमाशंकरला देवस्थानला जाण्याचाही प्लान करत असतील. जर तुम्हालाही भीमाशंकरला जायचे असेल तर १ जानेवारी २०२६ आधी जाऊन या. त्यानंतर मंदिर बंद राहणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *