पुणे: सुट्टीचा दिवस असूनही पुणे महानगरपालिकेने (PMC) शहरातील अतिक्रमणांविरोधात कडक मोहीम राबवत जोरदार कारवाई केली आहे. ज्या भागांमध्ये महापालिकेकडून यापूर्वी अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे, तिथे पुन्हा अतिक्रमण आढळल्यास संबंधित दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना थेट सील करण्यात येईल, असा स्पष्ट आणि कडक इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
'पुण्याचा आपला आयुक्त' या कौतुकाच्या फ्लेक्सवरही कारवाई
पुणे शहरात अतिक्रमणविरोधी धडक मोहीम सुरू असतानाच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे कौतुक करणारा 'पुण्याचा आपला आयुक्त' असा मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आला होता. या फ्लेक्सवर पुण्याच्या संस्कृतीला साजेसा, पुण्याला आपले मानणारा आणि पुणेकरांसाठी निर्मळ व निस्वार्थी मनाने झटणारा आयुक्त, अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. मात्र, हा फ्लेक्स अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाल्याने महापालिकेने त्याच्यावरही कारवाई करून तो हटवला. तसेच बालगंधर्व चौकातील होर्डिंग अधिकृत असले तरी त्यावरील फ्लेक्सवर प्रकाशकाचे नाव आवश्यक असल्याने संबंधित होर्डिंगधारकाला नोटीस बजावण्याची प्रक्रियाही समोर आली आहे.
पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा इशारा
व्यावसायिकांनी आणि आस्थापनांनी आपल्या इमारतीच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमधील जागा सार्वजनिक वापरासाठी खुली ठेवणे बंधनकारक आहे. अतिक्रमण कारवाईनंतर त्याच जागेवर पुन्हा अतिक्रमण केल्याचे आढळल्यास कोणतीही सबब न ऐकता संबंधित दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना महापालिकेकडून सील केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. शहरातील रस्ते व पदपथ मोकळे आणि सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्याकडून कारवाईची पाहणी
गंगाधाम चौक ते लुल्लानगर परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून झालेल्या कारवाईचा सविस्तर आढावा घेतला आणि ही मोहीम अधिक प्रभावी, पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. शहरातील विविध भागांत अतिक्रमणांविरोधात सुरू असलेल्या या सलग कारवाईमुळे अनधिकृत बांधकामे, शेड, स्टॉल्स आणि फ्लेक्सधारकांचे धाबे दणाणले आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नागपूर: कापसावरील आयात शुल्क २० टक्के करा, अन्यथा लक्ष्यित आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचा नागपुरातून सरकारला १५ दिवसांचा इशारा
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: बस स्थानकातून एसटी पळवण्याचा प्रयत्न, कुंपण तोडून अर्धवट महामार्गावर आली बस; ४५ लिटर डिझेलही लंपास, दोडामार्गात खळबळ!
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- धुळे: सोशल मीडियावर बदनामी, वैतागलेल्या धुळ्याच्या महापौरांकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न; आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती, धुळ्यात निषेध मोर्चा
- नवी मुंबई: आगीचा तांडव! सानपाड्यातील सप्तशृंगी ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!
- गोवा: 'एनीव्हेअर रजिस्ट्रेशन' मुळे नागरिकांना मोठा लाभ! म्हापशातील नूतनीकृत बार्देश उपनिबंधक कार्यालयाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू


























Subscribe to my channel



