पुणे: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव २०२६ चे यजमानपद एमकेएसएसएसच्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (KBJIIT), पुणे यांनी भूषविले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थिनींनी स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे आवाहन करण्यात आले.
एमकेएसएसएस कॅम्पस, कर्वेनगर, पुणे येथील इचलकरंजी सभागृहात झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी, “तुम्हीच तुमच्या जीवनाच्या आर्किटेक्ट आहात. तुमच्या आयुष्याची दिशा, ध्येय आणि भविष्यातील वाटचाल तुम्हीच ठरवायची आहे,” असे प्रतिपादन केले. विद्यार्थिनींनी केवळ संधींची वाट न पाहता “तुमची जागा तुम्ही स्वतः निर्माण करा आणि जिथे काम कराल तिथे तुमच्या कार्यातून स्वतःची ओळख निर्माण करा,” असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणासोबत कौशल्य, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्याचा संदर्भ देत प्रा. चक्रदेव यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ यांनी एकत्रितपणे कार्य करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि आत्मनिर्भर पिढी घडविणे ही दोन्ही संस्थांची सामायिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना साहित्य, ललित कला, संगीत, सांस्कृतिक तसेच विविध कला प्रकारांमध्ये आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, सर्जनशीलतेला आणि नेतृत्वगुणांना चालना मिळते, असे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी एमकेएसएसएसचे अध्यक्ष श्री. रवींद्र देव, उपाध्यक्ष डॉ. आनंद लेले, डॉ. नितीन एस. प्रभूतेंडोलकर, डॉ. अनघा वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक व कर्मचारी, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक, परीक्षक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पश्चिम महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये युवा महोत्सवाबद्दल उत्साहाचे वातावरण असून, दोन दिवस विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




