सोलापूर : सिद्धेश्वर बाजार समितीमध्ये कांदा लिलावासाठी जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागेची मागणी वारंवार पुढे येत होती. त्यासाठी बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने बाजार समितीच्या विस्तारीकरणास हिरवा कंदील दाखवला आहे. बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे कांदा लिलावासाठी तब्बल ४० एकर जमीन खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला बाजार समितीच्या संचालक मंडळाने एकमुखाने मंजुरी दिली असून, आता पणन संचालकांच्या अंतिम मान्यतेनंतर जमीन खरेदीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार आहे.
बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बाजार समितीच्या संचालक मंडळाची महत्त्वाची सभा पार पडली. या सभेत विषयपत्रिकेवरील तब्बल ४५ महत्त्वाच्या विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज अत्यंत सुरळीत व पारदर्शक चालण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करणे, सोलर पॅनेल बसवणे, मुख्य प्रवेशद्वारासह इतर प्रवेशद्वारांचे अंदाजपत्रक तयार करणे यासह सिमेंट रस्त्यांच्या कामांची बिले अदा करणे आणि पहिल्या मजल्यावरील बैठक सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामांची बिले अदा करण्यास संचालक मंडळाने विशेष मंजुरी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, पणन संचालकांच्या मंजुरीनंतर पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
रस्ते स्वच्छतेसाठी नवीन स्वीपर मशीन व ट्रॅक्टर खरेदी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बाजार समितीमधील अंतर्गत रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी नवीन स्वीपर मशीन आणि ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या विषयासही मंजुरी देण्यात आली. बाजार समितीमध्ये विशेषतः कांदा, मिरची, फळे आणि भाजीपाला विभागात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. वाहनांची व लोकांची सतत मोठी वर्दळ असल्याने अनेकदा कचरा तसेच पडून राहतो. यामुळे आता परिसराची स्वच्छता उत्तम राखण्यासाठी आधुनिक स्वीपर मशीन व ट्रॅक्टर खरेदी करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.
दिलीप माने यांची माहिती याविषयी बोलताना सिद्धेश्वर बाजार समितीचे सभापती दिलीप माने म्हणाले की, "बाजार समितीच्या विस्तारीकरणासाठी बोरामणी येथे ४० एकर जमिनीची पाहणी करण्यात आली आहे. सध्या बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी व्यावसायिक उलाढाल वाढली आहे. बाजार समितीकडे त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. कांदा लिलावासाठी नवीन जागेची गरज होती, जी आता पूर्ण होत आहे. संचालक मंडळाने जागा खरेदीस मंजुरी दिली असून, आता पणन संचालकांच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळताच लवकरात लवकर जागा खरेदी केली जाईल."
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




