
Yerwada : येरवडा जेल रस्त्यावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाशेजारील मोकळ्या जागेत उभारलेल्या वाहनांना सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. दुचाकी वाहनांच्या टाकीतील पेट्रोल आणि ऑइलच्या भडक्यामुळे हवेत आगीचे उंच लोट दिसत होते. पन्नासहून अधिक दुचीकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, तर २०हून अधिक चारचाकी वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये काही सरकारी वाहनांचाही समावेश आहे. वाहनांच्या आजुबाजूला गोवऱ्या थापल्याने आग वेगाने वाढली.
येरवड्यातील सरकारी बंगला क्रमांक पाचमध्ये भूमी अभिलेखचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारील मोकळ्या जागेत दुचाकी आणि एकावर एक चारचाकी वाहने लावण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून वाहने धूळ खात पडली आहेत. त्यामुळे काही स्थानिक गोठाचालकांनी भंगारात टाकलेल्या या वाहनांच्या आजूबाजूला गोवऱ्या थापून ठेवल्या आहेत.
दुचाकी वाहनांच्या टाकीतील पेट्रोल, ऑइल आणि जमिनीवर थापलेल्या शेकडो गोवऱ्यांमुळे आग वेगाने वाढली. त्यामुळे आगीचे लोट दोन किलोमीटरपर्यंत उंच गेले होते. येरवड्यापाठोपाठ नायडू आणि धानोरी अग्निशमन केंद्रांच्या वाहनांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत पन्नासहून अधिक दुचाकी वाहने जळून खाक झाली. अग्निशमन अधिकारी सोपानदेव पवार आणि जवानांनी आग आटोक्यात आणली.
वाहने नेमकी कोणाची?
आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या वाहनांमध्ये काही 'महाराष्ट्र शासन' लिहिलेली चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे ही वाहने राज्य उत्पादन शुल्क विभागाची आणि जप्त केलेली वाहने असल्याचा कयास होता; पण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही वाहने विभागाची नसल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी येरवडा वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आग लागलेली वाहने विभागाची नसल्याचे सांगून निघून गेले. त्यामुळे आगीत नुकसान झालेली वाहने नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजूनही त्या ठिकाणी जप्त केलेल्या रिक्षा लावलेल्या आहेत. संबंधित विभागांनी लावलेली वाहने तातडीने काढून घ्यावी अशी मागणी शेजारी राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




