गेल्या आठवड्यात कन्याकुमारी येथील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मधुमिता उद्योजक पतीसोबत कुटुंबासाठी शॉपिंगला गेली होती. परत येऊन पाहतात तर बेडरूमच्या कपाटाचे कुलूप तुटलेले होते. सुमारे एक कोटी रुपयांचे मौल्यवान सामान गायब होते. संध्याकाळच्या त्या थोड्याशा वेळात घरात कुणीच नाही, हे चोरांना कसे कळले? याचे पोलिसांना आश्चर्य वाटत होते. तपासादरम्यान पोलिसांनी मधुमिताच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी पाहिल्या. तेव्हा त्यांना धक्काच बसला. रील्स आणि पोस्ट्समध्ये त्या घरातील दागिने व गादीवर पसरवलेल्या नोटांची बंडले दाखवत होत्या. मुलावर नोटांचा पाऊस पाडत होत्या. तपास अधिकाऱ्याने सांगितले, “त्यांनी असे व्हिडिओही अपलोड केले होते. त्यात त्यांचे कुटुंब दर महिन्याला सोने खरेदी करत असल्याची बढाई मारली होती. इतर रील्समध्ये कुटुंब कुठे आणि कोणत्या कामासाठी बाहेर जात आहे, याचा खुलासा त्या नियमितपणे करत असत. “ही निरर्थक गोष्ट वाचून वेळ का वाया घालवायचा?’ असे म्हणून ही घटना फेटाळून लावू नका. तुम्ही याची टीका करताना नाके मुरडत असाल, हे मी समजू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे, मधुमिताची ही कृती आपल्याला शिकण्याची एक मोठी संधी देते. दुसरी गोष्ट म्हणजे, मुलावर नोटा उधळण्याची आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी हे शूट करण्याची मधुमिता यांचा हा मूर्खपणा. यावरून मला फ्रेंच कादंबरीकार ऑनरे द बाल्झाक यांची एक जुनी म्हण आठवली. “प्रत्येक मोठ्या संपत्तीमागे काहीतरी मोठा गुन्हा दडलेला असतो.’ ही ओळ त्यांच्या 1835 मधील ‘ले पेअर गोरियो’ या फ्रेंच कादंबरीतील आहे. याचा अर्थ ‘फादर गोरियो’. ही कहाणी 1819 मधील पॅरिसमधील एका वृद्ध वडिलांची आहे. ते दोन कृतघ्न मुलींसाठी सर्वस्व पणाला लावतात. गोरियो आपली संपूर्ण संपत्ती त्यांच्या चैनीसाठी आणि उच्च समाजात त्यांचे विवाह घडवून आणण्यासाठी खर्च करतात. त्यांचा पैसा संपतो, तेव्हा मुली त्यांना सोडून जातात आणि अत्यंत गरिबीत त्यांचा मृत्यू होतो. ही शोकांतिका पाहून रस्तिन्याक नावाचा एक तरुण विद्यार्थी शिकतो की, लोभ आणि सामाजिक महत्त्वाकांक्षेसाठी प्रामाणिकपणा सोडल्यास माणसाचे चारित्र्य नष्ट होते. मी हे पुस्तक वाचले. तेव्हा मला यातून दोन गोष्टी शिकायला मिळाल्या. मुलांसाठी हे पुस्तक सांगते की, खरा आनंद हा प्रेम, कृतज्ञता आणि प्रामाणिकपणातून मिळतो. संपत्ती किंवा सामाजिक प्रतिष्ठेतून नाही. हे पुस्तक या गोष्टीवर भर देते की, खरे प्रेम पैशाने विकत घेता येत नाही. ते लोभापासून सावधही करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भौतिक सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पालकांच्या निःस्वार्थ त्यागाचा आदर आणि कदर केली पाहिजे, याची आठवण हे पुस्तक मुलांना करून देते. मोठ्या माणसांना हे पुस्तक स्पष्टपणे सांगते की, भलेही तुम्ही स्वतः भौतिकवादाचा स्वीकार करत नसाल, तरी तुमच्या संपत्तीचा किंवा ऊर्जेचा इतरांवर काय परिणाम होतोय याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मुलींच्या दिखाऊ जीवनशैलीसाठी आंधळेपणाने पैसे देऊन गोरियो यांनी नकळत त्या उच्च समाजातील भ्रष्टाचारालाच खतपाणी घातले, ज्याने त्यांच्या कुटुंबाचा विनाश केला. पैशाच्या बाबतीत पूर्णपणे निष्काळजीपणा बाळगल्यास तुमच्या आसपासच्या लोकांचा लोभ वाढू शकतो. पण संपत्तीने भरलेल्या आजच्या काळात लागू होणारा सर्वात मोठा धडा हा आहे की, गोरियो यांनी स्वतःचे पूर्ण समर्पण करूनही ते आपल्या मुलींना वाचवू शकले नाहीत. उलट यामुळे त्यांचा दिखाऊपणा वाढला, स्वार्थ वाढला आणि शेवटी त्यांचे चारित्र्य बिघडले. म्हणजेच, निःस्वार्थ समर्पणालाही मर्यादा नसेल तर ते विनाशकारी ठरू शकते. प्रतिष्ठेवर चालणाऱ्या या जगात पाऊल ठेवताना आपण आपल्या आत्म्याचे रक्षण केले पाहिजे, याची आठवण ही कादंबरी आपल्याला करून देते. माणसाची किंमत फक्त त्याच्या बँक खात्यावरून ठरवणाऱ्या जगातही, नैतिकता आणि मानवी संवेदना टिकवून ठेवण्याचे आव्हान ही कादंबरी आपल्याला देते. फंडा असा आहे की, प्रेमाच्या नावाखाली सर्वस्व पणाला लावले तरी त्याचे फळ चांगलेच मिळेल, याची खात्री नसते. आपल्या प्रियजनांना वाईट प्रवृत्तींपासून वाचवण्यासाठी, खऱ्या प्रेमासाठी ‘नाही’ म्हणण्याची हिंमतही दाखवावी लागते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
महाराष्ट्र
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
गुन्हा
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल

























Subscribe to my channel




