शहापूर: सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर काही ठिकाणची रस्त्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे चालकांना खड्डा किती मोठा आहे? याचा अंदाज घेता येत नाहीये. केवळ दोन दिवसांमध्ये या खड्ड्यांमुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
शहापूर या ठिकाणी खड्ड्यामध्ये पडून टी डी आर एफ जवान विकास लहू गोरे याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शहापूरवरून ठाण्याकडे दुचाकीवरुन कामावर जात असताना खड्ड्यात गाडी गेल्याने दोन्ही टायर फुटले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे भिवंडी ठाणे मार्गावरील राहनाळ येथे खड्यामुळे भीषण अपघात झाला.
राहनाळ गावाजवळील काँक्रीट रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात गेल्याने घसरली. अपघातात अक्षयलाल पाल हे रस्त्याच्या कडेला पडले, तर सुनिता पाल या रस्त्याच्या मधल्या बाजूला पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अक्षयलाल पाल जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत. दरम्यान, भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अनेक काँक्रीट रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी वारंवार अपघात घडत असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा अशा दुर्घटना थांबणार नाहीत, तसेच दुर्घटनाग्रस्त झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रशासना कडे केली आहे.
पालघरच्या वाडा तालुक्यातील कंचाड-गो-हे फाटा राज्य मार्ग क्रमांक ३४ ची देखील अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास जीवघेणा बनला आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणेही कठीण झाले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अपघात वाढत असून, शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना या खराब रस्त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर या रस्त्याच्या सुधारणेसाठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याची मागणी जोर धरत आहे. कंचाड- गोहे फाटा रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे... मात्र मंजूर निधीतून दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता तयार होणार का? याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मनसेचे अविनाश जाधव यांनी खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. "दर वर्षी पाऊस पडल्यावर खड्डे पडताता. आम्ही सांगत असतो पावसाळा यायच्या आधी सांगतो खड्डे बुजवा. काल आणि आज एक मृत्य झाला सरकार कुठे आहे? ठाण्याचे पालकमंत्री कुठे आहेत? भिवंडीरस्त्याची अवस्था किती गंभीर आहे. आमचा आरोप आहे ज्याला डेंटर दिले तो काम करतो की नाही? ठाण्यात एवढे प्रश्न आहे, मात्र पालमंत्री कुठे दिसत नाही. गडकरी म्हणाले होते, अमेरिकेसारखे रस्ते करणार, मात्र श्रीलंकेसारखे रस्ते करा. ह्यांना लोकांसाठी काही घेणं देण नाही. लोकांसाठी रस्ते करताय ते फक्त टोलसाठी करताय. कपली पाटील यांच्याघराजवळ ब्रिज आताच खाली खचला आहे. पुढचा माणूस मरत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार आहे" असे ते म्हणाले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




