
Salman Khan : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपासून देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानाच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई, कल्याण, ठाणेसह १३ मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. अनेक कलाकार आपला मतदानाचा हक्क बजावत मत देताना दिसत आहेत. सलमान खानदेखील २० मे रोजी त्याचा हक्क बजावून मत देणार आहे.
मतदानाच्या दिवशी अनेकजण निष्काळजीपणा करीत त्यांचे मत वाया घालवतात. अशा लोकांसाठी सलमानने त्याच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात सलमान स्वत: देशाचा सुजाण नागरिक म्हणून मतदान करणार आहे, असे त्याने सांगितलेय. तसेच सगळ्यांनी मतदान करा, असे आवाहनही त्याने जनतेला केले आहे.
|
|
सलमान खानने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर मतदानाविषयक एक पोस्ट शेअर केलीय या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमानने या पोस्टमध्ये लिहिले, “काहीही झालं तरी मी वर्षाचे ३६५ दिवस व्यायाम करतो आणि आता काहीही झालं तरी २० तारखेला मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुम्हाला जे काही करायचंय ते करा; पण आधी जा आणि मतदान करा. तुमच्या भारतमातेला त्रास देऊ नका. भारतमाता की जय.”
मतदान करणं हा सगळ्यांचा हक्क आहे आणि तो सामान्य नागरिकांपासून ते कलाकार बजावताना दिसत आहेत.
तरीही असे काही लोक असतात; जे मतदान करण्यापासून लांब राहतात. पुढच्या पाच वर्षांचा विकास हा आपल्या एका मतावर अवलंबून असतो. म्हणून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कलाकारांपासून ते क्रिकेटर्सपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाचा वापर करीत मतदान कराच, असं सलमाननं बजावून सांगितलं आहे.
दरम्यान, सलमान खानच्या कामाबाबत सांगायचं झालं, तर सलमानचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात साऊथ स्टार रश्मिका मंदाना सलमानबरोबर पहिल्यांदा झळकणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास व सलमान या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
‘सिकंदर’च्या शूटिंगची सुरुवात मे महिन्यात सुरू होणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण भारत आणि युरोपमध्ये होणार आहे. चित्रपटाच्या बजेटबद्दल जरी अजूनही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अंदाजे या चित्रपटाचं बजेट ४०० कोटी इतकं असल्याचं बोललं जातंय. चाहते सलमान खान आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



