तुरुंगात रात्र घालवणे हे ऐऱ्या गबाळ्याचे काम नाही, कारण येथे रात्र काढताना भल्याभल्यांची बोबडी वळते. अनेक नामीगिरामी खून, दरोडे आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींचा तुरुंगात सहवास मिळू शकतो. त्यामुळे तुरुंग म्हटला की घाम फुटतो. परंतू ऑस्ट्रेलियात जगातील खतरनाक तुरुंगात रात्र काढायला अनेक श्रीमंत एका पायावर तयार असतात. ऑस्ट्रेलियात सर्वात खतरनाक जेल आहे जेथे पैसे देऊन रात्र काढण्यासाठी लोक येत असतात. यास तुम्ही वेडेपणा म्हणाल परंतू गोष्ट वेगळीच आहे.
डेली मेलच्या बातमीनुसार ऑस्ट्रेलियातील जगातील सर्वात खतरनाक जेल पैकी एक असलेल्या एचएम प्रिजन पेंट्रिज तुरुंगात लोकांना एक रात्र काढण्यासाठी किमान २८ हजार रुपये खर्च करावा लागतो. कारण हा तुरुंगाचे रुपांतर फाईव्ह स्टार हॉटेल सारखे केला आहे.या जेलमध्ये कधीकाळी ऑस्ट्रेलियाचा सर्वात कुख्यात आरोपींचे घर झाले होते. यात रोनाल्ड जोसेफ रयान आणि मार्क ‘चॉपर’ रीड सारख्या गँगचे सदस्यांनी देखील शिक्षा भोगली आहे. ऑस्ट्रेलियात फाशी झालेला हा शेवटचा कैदी आहे.
खतरनाक आरोपींचे माहेर घर
येथे उतरणारे गेस्ट त्या हॉल आणि रुममध्ये राहु शकतात जेथे कधी काळी सर्वात खतरनाक आरोपी फिरायचे. या रुमचे एकारात्रीचे भाडे AU$449.00 म्हणजे 28 हजार रुपयांपासून सुरु होते. या जेलच्या मध्यभागी एक आलिशान अंडरग्राऊंड तुरुंग आहे. यात तयार करण्यास तीन महिन्यांहून जास्त काळ लागला होता.कारण त्याची निर्मिती तुरुंगाच्या मूळ स्वरुपांना धक्का न लावता केली आहे.
अनेक लक्झरी सुविधा
हा तुरुंग आता 5 स्टार रुममध्ये परावर्तित झाला आहे.त्यामुळे बाहेरुन आत जाताना आपण तुरुंगात जात आहोत असा फिल येतो. परंतू आता लक्झरीयस सुविधा आहे. यात हॉटेलमध्ये १९ स्युईट आहेत. ज्यांना चार वा पाच रुमंना आतून जोडण्यासाठी जाड्या निळ्या दगडांच्या भींतींना तोडून तयार केले आहे. प्रत्येक रुमला घुमटाकार छत आणि दगडांच्या भींती आहेत. पूर्वीचा हेरिटेज लूक आणि आत आधुनिक सुविधा आहेत. यात हंटर लॅब हेअर आणि स्कीनकेअर सह अनेक लक्झरी सुविधा आहेत. स्थानिक वस्तूंनी सुसज्ज एक शानदार मिनीबारही आहे.
140 एकर भागात भागात वसलंय जेल
1851 ते 1997 मध्ये हा खरोखरचा तुरुंग होता. 19 व्या शतकात ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियामध्ये निर्मित सर्वात मोठा तुरुंग परिसर होता. एचएम प्रिझन पेंट्रिजची स्थापना 1850 मध्ये झाली होती, जी मेलबर्नपासून 8 km उत्तरेकडे पेंट्रिज नावाच्या 140 एकर भागात झाली होती. आज या भागाला कोबर्ग नावाने ओळखले जाते. सरकारद्वारा तुरुंगाचे खाजगीकरणांतर्गत यास बंद केले गेले. व्हिक्टोरिया राज्य सरकारने या पेंट्रिजला स्वतंत्र इस्टेट डेव्हलपर्सला विकले. त्यानंतर 2023 मध्ये हे हॉटेल उघडले.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




