
Vijay Shivtare On Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारेयांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे. त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांविरोधात बारामतीत शड्डू ठोकला आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं शिवतारेंनी जाहीर केलं आहे. त्यानंतर त्यांनी अजित पवारांवर चांगलाच हल्लाबोल केला. अजित पवारांमधला उर्मटपणा गेला नाही, जनतेलाही ते आवडत नाहीत. त्यामुळे शप्पत घेऊन सांगतो बारामतीतून अजित पवार जिंकू शकत नाही, आमची लढाई सुप्रिया सुळेंबरोबर आहे, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आज शिवतारे यांनी सासवडमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर ते बोलत होते.
विजय शिवतारे काय म्हणाले?
शिवतारेंनी अजित पवारांवर चांगलाच हल्लाबोत केला आणि गावातील लोक काय म्हणतात हे सांगितलं, ते म्हणाले की, मी अनेक गावागावत फिरतो. त्या गावात सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया अजित पवारांच्या विरोधातल्या आहेत. सगळ्या प्रतिक्रियावरुन मी सांगतो की अजित पवार काहीही करु देत ते जिंकू शकणार नाहीत. आमची लढाई अजित पवारांविरोधात नाही तर आमची लढाई ही सुप्रिया सुळेंविरोधात आहे. अजित पवार न जिंकण्याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेला उर्मटपणा आहे. त्याच्याविरोधात सामान्य जनता आहे. देवाची शप्पत घेऊन सांगतो अजित पवारांविरोधात लोक प्रतिक्रिया देत आहेत, असं ते म्हणाले.
|
|
मी साधारण कार्यकर्ता नाही, मी मंत्री आहे!
'नमो रोजगार मेळाव्याच्या दिवशी मी अजित पवारांना फुलांचा गुच्छ घेऊन गेलो. माझा प्रोटोकॉल होता म्हणून गेलो होतो. मात्र त्यांनी माझ्याकडे लक्षही दिलं नाही. मी काही साधारण कार्यकर्ता नाही तर मी मंत्री आहे. ते असतील पन्नास हजार कोंटीचे पण मी अब्जोंबमध्ये काम करणारा माणूस आहे ते पण स्वत:च्या कर्तृत्वावर. स्वागत करायला गेलो असता त्यांनी लक्ष दिलं नाही त्यावेळी माझा जिल्हाप्रमुख म्हणाला की बापू याला धडा शिकवला पाहिजे. या अजित पवारांचा माज गेलेला दिसत नाही', असा हल्लाबोल त्यांनी अजित पवारांवर केला आहे.
लोक म्हणाले, अजित पवारांना मतदान करणार नाही!
"त्यांना मी माफ केले होते, महायुती झाल्यानंतर. पण त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांचा उर्मटपणा कायम होता. म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाहीत असे लोकांनी सांगितले. पवारांच्या विरोधातली मते आहेत. लोकांचा घात होतोय असं कळले.", असं शिवतारे म्हणाले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




