
Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस. आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपसमिती आणि मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट तत्वत: लागू करण्याची तयारी दाखवली आहे.
यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून, गावपातळीवर समित्यांची स्थापना करून ठराविक कालमर्यादित हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून देण्यात आली आहे. या संदर्भातील मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.
मसुदाबाबत सहमती झाल्यास राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्ध केला जाईल. मात्र, मराठा आंदोलक आणि सरकारमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. हैदराबाद गॅझेटमध्ये तालुक्यांमधील जातीनिहाय लोकसंख्येची आकडेवारी आहे. त्याआधारे कुणबी जातप्रमाणपत्र देण्यासाठी गावपातळीवर समित्या स्थापन करण्यात येणार आहे. या समित्या संबंधित गावातील कुणबी नोंदींच्या आधारे ओळख निश्चित करून प्रमाणपत्र देण्याचे काम करतील, असे मसुद्यात नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली. मात्र, काल दिवसभरात कोणतेही प्रतिनिधी आंदोलकांकडे गेले नाहीत. आज मुसदा तयार करण्यात आला असून, तो उद्या आंदोलकांकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
पहिले पाऊल कोण उचलणार?
सरकार आणि आंदोलक या दोघांकडूनही चर्चेसाठी पहिले पाऊल उचलले जाईल का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळात विधिज्ञ किंवा तांत्रिक बाबींवरील तज्ज्ञ नसल्यानं सरकार नेमकी कुणाशी चर्चा करणार? असाही प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शहर
- मुंबई: राज ठाकरेंचे मोठे भाकीत खरे ठरत मोदी-अदानींवर सोडला 'व्हिडिओ बॉम्ब', राजकीय वर्तुळात खळबळ!
- मुंबई: धडाकेबाज कारवाई करूनही आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर फार्मासिस्ट का झाले प्रचंड नाराज? समोर आले मोठे कारण!
- मुंबई: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! दोन्ही सीईटी परीक्षा आता बोर्डाच्या परीक्षेनंतरच; तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ अन् दोनदा परीक्षा देण्याची संधी
- नाशिक: कावळा की गिधाड? नाशिककर मतदानातून निवडणार आपल्या शहराचा अधिकृत पक्षी; पर्यावरण संवर्धनासाठी आगळावेगळा उपक्रम!
महाराष्ट्र
- मुंबई: राज ठाकरेंचे मोठे भाकीत खरे ठरत मोदी-अदानींवर सोडला 'व्हिडिओ बॉम्ब', राजकीय वर्तुळात खळबळ!
- रत्नागिरी: मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून सामाजिक कार्यकर्त्याची ५ हजारांची फसवणूक, खेड पोलिसांत गुन्हा दाखल
- रत्नागिरी: अत्यंत हृदयद्रावक घटना! लग्न ठरून घरी वधूचे पाहुणे येणार त्यापूर्वीच क्रिकेट खेळताना चक्कर आल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!



























Subscribe to my channel




