
Mumbai : अॅक्वा लाइनच्या ( Aqua Line ) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या फीडर बस सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही सेवा आता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो लाइन 3 च्या प्रवाशांना लास्ट माइल कनेकटीव्हीटी मिळावी यासाठी ही बस सेवा सुरू केली होती. परंतु, अनेक महिने उलटूनही प्रवासी संख्येत वाढ झाली नसल्याने ही सेवा कमी करण्यात आली आहे.
CityFlo आणि नवकारकडून सेवा
मेट्रो मार्गिका 3 सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर 2025मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. मेट्रो लाइन 3च्या सात महत्त्वपूर्ण स्थानकांवरून ही सेवा सुरू केली होती. मेट्रोमधून बाहेर पडताच प्रवाशांना वाहतूक कोंडीशिवाय घरी पोहचवून त्यांचा प्रवास आरामदायी करणं या सेवेचं उद्दिष्ट होतं. यासाठी सिटीफ्लो आणि नवकार ट्रॅव्हल्स या खासगी कंपन्यांसोबत बस सेवा देण्यात आली. परंतु, अनेक स्थानकांवर गर्दीच्या वेळीही या बस मोकळ्याच राहत आहेत. त्यामुळे आता सात ऐवजी केवळ मुख्य तीन स्थानकांवर ही सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.
नोव्हेंबर 2025पासून मुंबई मेट्रो 3च्या वांद्रे कुर्ला संकुल, वरळी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), विद्यानगरी, सिद्धिविनायक, कफ परेड आणि सीप्झ या सात स्थानकांवर या बस सेवा उपलब्ध होत्या. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान बस सेवा सुरू असायची. यावेळी ऑफिस व शाळा, महाविद्यालयात जाणारे प्रवासी सर्वाधिक संख्येत प्रवास करतात. यावेळी लोकलला गर्दी असून, मुंबईतील रस्त्यांवरही प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे मेट्रोमधून उतरून पुढच्या प्रवासात नागरिकांना गर्दी वर कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांच्या साठी फीडर बस सुरू केल्या. या बस दर 10 मिनिटांनी उपलब्ध होत्या. प्रवासी आसापासच्या व्यावसायिक केंद्र आणि कार्यालयांपर्यंत आरामात व वेळेत पोहचू शकतात.
प्रतिसाद का मिळाला नाही?
पण या फीडर बसला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता वांद्रे कुर्ला संकुल, सीएसएमटी व कफ परेड या तीन महत्त्वाच्या स्थानकांवरच ही सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय MMRCL ने घेतला आहे. या फीडर बसमध्ये एका फेरीसाठी 29 रुपये तिकिट असून मासिक पास 499 रुपये आहे. मेट्रोचे तिकिट काढल्यानंतर काही प्रवाशांना ही किंमत मोठी वाटू शकते. दरम्यान, या परिसरातील बरेच कामगार मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून लोकलने प्रवास करतात. अशा नागरिकांना लोकल, मेट्रो नंतर आणखी एका बस सेवेचे तिकिट काढणे शक्य होत नसावे असा अंदाज आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




