कान चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायलापाहून मला समाधान वाटले. कारण माझ्यासारखी तीहीआता ‘हेल्दी’ दिसते. बावन्नाव्या वर्षी पंचविशीतल्यामुलीसारखे दिसणे शक्य नाही, हे वास्तव आहे. पणबॉलिवूड हे स्वीकारायलाच तयार नाही. रिॲलिटी शोचेपरीक्षण करतात, पण वास्तव स्वीकारत नाहीत. थोडा विचार करा. या अभिनेत्रीचा चित्रपट पाहण्यासाठीमी कॉलेज बंक केले होते. ती तीस वर्षांनंतरही तशीचदिसते. तिचा आहार काय असेल- उकडलेल्या भाज्या,सॅलडची पाने की फक्त हवा? माझ्या मनात एकच प्रश्नयेतो- चविष्ट अन्नापासून वंचित असलेली व्यक्तीखरोखर आनंदी असू शकते का? आता औषध कंपन्यांनी यावर उपाय शोधल्याचागाजावाजा सुरू केला आहे. औषध तयार झाले होतेमधुमेह असलेल्या लोकांसाठी. पण आता त्याचा वापर ‘डायमीटर’ची चिंता असलेले लोकही करू लागलेआहेत. ओझेम्पिक घ्या आणि स्वतःच जाणून घ्या. पणहो, कोणाला सांगू नका. अरे, मी तर खूप व्यायाम केला. नाश्त्यात चिया खाल्ले, दुपारी दुधी भोपळा. तुमच्या इच्छाशक्तीचे खरंच कौतुक करावे लागेल. औषधांचे दुष्परिणामही तुम्ही किती धैर्याने सहन करता. डोळे मिटूनमनात कल्पना करत असाल- चरबीखाली काय आहे,चरबीखाली… मी सांगते- हाडे. आज अनेक प्रसिद्धव्यक्ती कोमेजलेल्या झाडासारख्या दिसू लागल्या आहेत.शरीर सुकलेले, चेहरा कोरडा. गाल नाहीत, फक्त खळगेउरलेत. वजन नक्की कमी झाले आहे, पण त्याचबरोबरचेहऱ्याची चमकही हरवली आहे. अर्थात, ती त्यांचीवैयक्तिक निवड आहे. पण सामान्य लोक स्टार्सचेअनुकरण करतात, त्यामुळे माझा एकच सल्ला आहे-शॉर्टकट घेऊ नका. खरोखर वैद्यकीय कारणांसाठीऔषधांची गरज असेल, तरच ती घ्या. फक्त लग्न ठरलेआहे म्हणून पटकन दहा किलो वजन कमी करायचे,म्हणून सोपा मार्ग निवडू नका. अशा औषधांचा दीर्घकाळवापर केल्यावर काय परिणाम होईल, हे कुणालाही माहीतनाही. मग उगाच धोका का घ्यायचा? आपल्यालासगळ्यांनाच माहीत आहे की काय करायला हवे-पौष्टिक खा, जिमला जा. पण माझ्या मते वजनवाढण्यामागचे सर्वात मोठे कारण काही वेगळेच आहे.आपण जास्त खातो तरी का? कारण अन्नाने आपणफक्त पोटाची नव्हे, तर मनाचीही तृप्ती करत असतो. लहानपणापासून अन्नाला आपण आईच्या मायेबरोबरजोडले आहे. ‘बाळा, अजून एक घास खा, माझ्यासाठीखा.’ प्रत्येक टप्प्यावर आपण अन्नाला केवळ अन्नमानत नाही, तर भावनांशी जोडतो. कोणतेही नातेवाईकघरी आले की आपण म्हणतो- जेवूनच जा. त्यांच्याताटात एक पोळी जास्त वाढतो. यालाच आदरातिथ्यम्हणतात. लग्नात १२५ पदार्थ नसतील, तर ती लग्नाचीमेजवानीच कसली? जेवत-जेवत पोटावर नाड्याचाठसा पडला नाही, तर मेजवानीत काहीतरी कमी राहिलेअसे वाटते. सुख असो वा दु:ख, अन्नाशी आपले नातेकायम राहते. संयम ठेवायला हवा हे माहीत असूनही मनमानत नाही. सगळ्या समस्येचे मूळ तेच आहे. मी असेम्हणत नाही की केक, आइस्क्रीम किंवा समोसा कधीचखाऊ नका. फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा- मी उदासअसताना मला काहीतरी खावेसे वाटते का? आणि तेहीपोळी-भाजी, डाळ-भात नव्हे. काहीतरी गोड किंवाचटपटीत. जेणेकरून मन हलके होईल, दु:ख दडपलेजाईल. यालाच इमोशनल ईटिंग म्हणतात. स्वतःपासूनदूर पळण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे. तुम्ही अन्नातप्रेम, आपलेपणा, समाधान शोधत असता; पण ते तुम्हालाफक्त अतिरिक्त कॅलरीज देऊ शकते. म्हणून पुढच्यावेळी अवेळी किंवा विनाकारण खाण्याची इच्छा झाली,तर दोन मिनिटे डोळे मिटा. स्वतःला विचारा- माझ्याआत नेमके काय सुरू आहे? पेन उचला आणि दहामिनिटे आपल्या भावना कागदावर उतरवा. रडू येतअसेल, तर अश्रू वाहू द्या. राग येत असेल, तर तोकागदावर उमटू द्या. लिहून झाल्यावर एक दीर्घ श्वासघ्या. ती वाईट भावना निघून गेली ना? पोटाची खरी भूकअसेल, तर जरूर खा. तुपाची पोळी खाण्याला घाबरूनका. हाडे दिसणाऱ्यांशी स्पर्धा करू नका. त्यांना हवामुबारक, तुम्ही मात्र खऱ्या अन्नाचा आनंद घ्या। (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) आपण उदास असतो, तेव्हा काहीतरीखावेसे वाटते का? आणि तेहीपोळी-भाजी, डाळ-भात नव्हे. काहीतरीगोड किंवा चटपटीत. जेणेकरून मनहलके होईल, दु:ख दडपले जाईल. यालाचइमोशनल ईटिंग म्हणतात. स्वतःपासून दूरपळण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
महाराष्ट्र
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

























Subscribe to my channel




