पुणे: एक अत्यंत खळबळजनक, धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नी लग्नानंतरही तिच्या प्रियकराशी संधान ठेवून असून सतत आत्महत्येची धमकी देत असल्याच्या त्रासाला कंटाळून एका तरुण पतीने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या हातावर "बायकोने आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला" असा मजकूर लिहीला होता, तसेच बेडवर सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या दुर्दैवी घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत तरुण प्रवीण दत्ता माने (वय २८, रा. झेड एच हाईटस, मांजरी, पुणे) असे त्याचे नाव आहे. प्रवीण माने याचा त्यांच्याच नात्यातील मुलगी प्रणाली हिच्याबरोबर अरेंज मॅरेज पद्धतीने २० मे २०२५ रोजी गाधवड (जि. लातूर) येथे विवाह झाला होता. लग्landनंतर ते पुण्यातील मांजरी येथे एकत्र राहत होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, पत्नी प्रणाली हिचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध तिच्या लग्नानंतरही सुमीत जाधव (रा. गाधवड, जि. लातूर) याच्याशी सुरू असल्याचे प्रवीण याला समजले. ही बाब समोर आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. प्रणाली सतत भांडण करून प्रवीणला "मला तुझ्यासोबत राहायचे नाही" असे बोलून वारंवार जीव देण्याची धमकी देत होती.
दरम्यान, २० जुलै २०२६ रोजी प्रणाली ही कोणाला काहीही न सांगता अचानक घरातून निघून गेली. ती घरी न आल्यामुळे तिची हरवल्याबाबत मांजरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २१ जुलै रोजी प्रणाली ही स्वतःहून मांजरी पोलीस ठाण्यात आली. तिने सासू आणि पती आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप करत, आपल्याला त्यांच्यासोबत राहायचे नाही असे पोलिसांना सांगितले आणि ती आपल्या आई-वडिलांसोबत निघून गेली. पत्नीच्या या वागण्यामुळे आणि सततच्या त्रासामुळे प्रवीण प्रचंड मानसिक तणावाखाली आला होता.
पत्नी घर सोडल्याच्या दुःखातून आणि मानसिक विवंचनेतून २३ जुलै २०२६ रोजी सकाळी प्रवीण याने आपल्या बेडरूमचा दरवाजा बराच वेळ उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी व कुटुंबीयांनी धाव घेऊन दरवाजा तोडला, तेव्हा प्रवीणने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याच्या मृत्यूनंतर पाहणी केली असता, त्याने आपल्या हातावर पेनने "बायकोने आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला" असा संतापजनक मजकूर लिहिला होता. तसेच बेडरूममधील बेडवर एका कागदावर सविस्तर सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.
या प्रकरणी मृत प्रवीण माने याचा अंत्यविधी पार पडल्यानंतर त्याची आई ललिता दत्ता माने (वय ४८) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पत्नी प्रणाली प्रवीण माने ऊर्फ प्रणाली जगन्नाथ जाधव आणि तिचा प्रियकर सुमीत जाधव (दोनघे रा. गाधवड, जि. लातूर) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करत आहेत.
शहर
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
महाराष्ट्र
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात निलंबित विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ
- पुणे: लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; ७ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल, मोठी दुर्घटना टळली
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!



























Subscribe to my channel



