नागपूर: प्राण्यांचे मूक आजार ओळखून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या भावी डॉक्टरांच्या शिक्षणाचा महाराष्ट्रात पुरता बिया Preparation आणि सावळागोंधळ सुरू असल्याचे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (MAFSU) अंतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयांमध्ये पशुवैद्यकीय (Veterinary) विद्यार्थ्यांना जनावरांना प्रत्यक्ष हात न लावता, केवळ कागदावर आणि गुगलवर सर्च करून प्राण्यांच्या आजारांचे निदान करण्याचे शिक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे प्राण्यांवर प्रत्यक्ष उपचार करताना हे डॉक्टर कसे यशस्वी होणार, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाला केवळ निविदा आणि टक्केवारीमध्ये रस?या गंभीर परिस्थितीवर बोलताना सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील एका पशुवैद्यकीय विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. महाविद्यालयांमध्ये प्रॅक्टिकल किंवा प्रात्यक्षिकांसाठी पुरेशी जनावरेच उपलब्ध करून दिली जात नाहीत. प्राण्यांच्या शस्त्रक्रिया (Surgeries) कशा कराव्यात, त्यांचे आजार कसे ओळखावेत, याचे कोणतेही प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत नाही. जेव्हा एखादा आजार शिकवला जातो, तेव्हा त्याचे लक्षण आणि निदान समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट गुगलचा (Google) आसरा घ्यावा लागत आहे. शैक्षणिक सुविधा पुरवण्याऐवजी विद्यापीठ प्रशासनाला केवळ निविदा (Tenders) काढण्यात आणि त्यातील टक्केवारी (Percentage) गोळा करण्यातच जास्त रस असल्याचा थेट आरोप आता केला जात आहे.
अधिष्ठाता आणि संचालकांचे काय म्हणणे आहे?या सर्व प्रकरणावर 'माफसू'चे शिक्षण संचालक व अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी परिस्थिती गांभीर्याने घेत सुधारणांचे आश्वासन दिले असले, तरी मूळ पायाभूत सुविधांमधील त्रुटी अजूनही कायम आहेत. महाविद्यालयांमध्ये प्राण्यांचे क्लिनिक्स आणि प्रॅक्टिकल लॅब्स केवळ नावालाच उरल्या असून, निधीचा वापर विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य प्रकारे होत नसल्याचे चित्र आहे.भावी डॉक्टरांच्या आणि मूक प्राण्यांच्या भविष्याशी खेळपशुवैद्यकीय शिक्षणामध्ये केवळ पुस्तकी ज्ञान किंवा डिजिटल स्क्रीन पुरेशी नसते; जोपर्यंत विद्यार्थी प्रत्यक्ष जनावरांच्या शरीराचे परीक्षण करत नाहीत, तोपर्यंत त्यांना नाडीचे ठोके किंवा अंतर्गत आजारांचा अंदाज येऊ शकत नाही. अशा प्रकारे 'गुगल डॉक्टर' तयार होत राहिल्यास भविष्यात लाखो मूक प्राण्यांचे जीव धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातील या ढासळत्या पशुवैद्यकीय शिक्षण पद्धतीवर सरकारने तातडीने लक्ष देऊन या कथित टक्केवारीच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



