पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंबात या 5 गोष्टी आचरणात‎ आणल्या तर नैपुण्य प्राप्त होईल

आजकाल ‘कुटुंब निपुण बनवले जावे’ असा एक शब्द प्रचलित आहे.‎जर आपण 5 गोष्टी कुटुंबात आचरणात आणल्या, तर त्यातून कौशल्य ‎येईल: संस्कार, आरोग्य, समृद्धी, सामर्थ्य आणि सदस्यांमध्ये सतत‎ शिकण्याची भावना. कुटुंबात प्रत्येक वयोगटातील लोक असतात,‎त्यामुळे मोठ्यांनी असा समज करून घेऊ नये की, आपण जो विचार‎ केला तेच बरोबर आहे आणि लहानांनी हे बालिशपण करू नये किंवा‎ आता फक्त करत राहा, मग बघू. कुटुंबाला निपुण बनवण्यासाठी एक‎प्रयोग करा. प्रत्येक सदस्याच्या आत एक आतला आणि एक बाहेरचे ‎छोटे मूल दडलेले असते. बालपणीच्या ज्या गोष्टी तुम्हाला आठवत‎ असतील, विशेषतः भावाबहिणींसोबत जो वेळ घालवला असेल,‎अशा पाच-दहा गोष्टी लिहा आणि आजच्या परिस्थितीनुसार त्याचे ‎मूल्यमापन करा. त्या घटनांवर विचार केल्यावर तुम्हाला वाटेल की‎ आपण काय काय नाही केले- मूर्खपणा, समज, बालिशपणा. त्यावर‎ जितका विचार कराल, तितकाच आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात‎ तडजोड करावी लागली तरी तुम्ही खचून जाणार नाही. संघर्ष आला‎ तरी तुम्ही विखुरले जाणार नाही. आणि जर सदस्यांनी हा प्रयोग केला,‎तर असे सदस्य एकत्र येऊन कुटुंबाला निपुण बनवतील.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *