काही काळापूर्वी इंस्टाग्रामवर पूजाचे (पुजारिनी प्रधान)प्रकरण खूप चर्चेत होते. त्या पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागातील एक ‘कंटेंट क्रिएटर'' आहेत. त्या ग्रामीण जीवन, पुस्तके, स्त्रीवाद आणि समाज या विषयांवर व्हिडिओ बनवतात. त्यांची लोकप्रियता वेगाने वाढली,तसे त्यांच्या कामाच्या अस्सलतेवर प्रश्न उपस्थित केलेगेले. असे म्हटले गेले की, इतके दर्जेदार व्हिडिओ गावातील मुलगी एकटी बनवूच शकत नाही. यामागे नक्कीच एखादी एजन्सी किंवा ब्रँडचा पाठिंबा असावा. हळूहळू या वादाचे रूपांतर सिलेक्टिव्ह फेमिनिझमविरुद्ध ‘वास्तविक सक्षमीकरण'' अशा चर्चेत झाले. पूजाच्या बाजूने असा प्रश्न विचारला गेला की, कायग्रामीण भागातील स्त्री उत्तम इंग्रजी बोलू शकत नाही? आणि हा अधिकार काय फक्त शहरी स्त्रियांचाच आहे? या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट खेदजनक रीतीने स्पष्ट होते की, ‘टॉक्सिक फेमिनिझम'' हे ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी''इतकेच वाईट आहे. किंबहुना कदाचित त्याहूनही जास्त. समानतेच्या लढाईत आपण कुठेतरी केवळ ‘दिखाव्या''लाच मूल्य समजण्याची चूक करत आहोत. काही ठिकाणी तर आपण स्त्रीवादाच्या मूळ अर्थापासून खूप दूर जातो. आपण स्त्रीत्वाच्या अशारूपाला प्रोत्साहन देऊ लागलो आहोत. त्यात गोंधळखूप आहे. पण ते आतून पोकळ आहे. त्यात बंडखोरीतर आहे, पण आत्मपरीक्षण नाही. खरे सांगायचे तर,समजूतदारपणापेक्षा नाटकीपणा अधिक वेगाने पसरतो.मूर्खपणा लवकर लक्ष वेधून घेतो आणि सोशलमीडियाच्या अल्गोरिदमला तर संतापच जास्त आवडतो.परंतु एक अस्वस्थ करणारा प्रश्न देशाने स्वतःलाचविचारला पाहिजे. गावापासून शहरापर्यंत फक्त त्याचस्त्रिया भारतीय स्त्रीवादाचा आवाज बनतील का?कारण सत्य हेच आहे की, बहुसंख्य भारतीय स्त्रियाइंस्टाग्रामच्या जगात जगत नाहीत. हुंड्यासाठी आजहीदर तासाला त्यांची हत्या होते आणि दर १३ मिनिटालात्यांच्यावर अत्याचार होतात. 20 कोटी महिला घरगुतीहिंसाचाराच्या बळी आहेत. त्यांना शिक्षणासाठी संघर्षकरावा लागतो, कार्यालयांमध्ये समान पगारासाठीलढावे लागते आणि विवाह संस्थेत तर त्या रोजस्वातंत्र्याची लढाई लढतात. अशा घरात त्यांना रहावेलागते. त्यांच्यासाठी स्त्रीवाद ही दाखवण्याची गोष्टनसून आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. तरीही, आजभारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात बुलंदआवाज हे समाजातील एका लहानशा वर्गातून येतात. तो शहरी आहे, इंग्रजी बोलणारा आहे. डिजिटल जगाचीमाहिती असलेला आणि ‘अल्गोरिदम-मान्य'' आहे. हेपूर्णपणे चुकीचेही नाही, कारण प्रतिनिधित्व बदलतअसते. पण जेव्हा हे प्रतिनिधित्व एकमेकींना कमीलेखण्यात धन्यता मानते, तेव्हा आपल्याला थांबूनविचार करण्याची गरज आहे. स्त्रीवाद कधीही ‘तमाशा''बनण्यासाठी नव्हता. केवळ ३० सेकंदात कोणाला तरीहरवण्याची स्पर्धा म्हणजे स्त्रीवाद नाही. आपण सध्यापाहत आहोत, ती प्रगती नसून एक दिखावा आहे.त्याहूनही वाईट म्हणजे हा दिखावा त्याच व्यवस्थांनाबळकट करतो. खरे तर त्यांना स्त्रीवाद संपवायचा आहे.पुरुषप्रधान व्यवस्था हे पाहून हसते. कारण स्त्रियांनीजाहीरपणे एकमेकींना कमी लेखणे यापेक्षा पितृसत्ताकपद्धतीसाठी दुसरे चांगले काय असू शकते? भारतीय स्त्रीवादामध्ये संतापलेल्या, बिनधास्त किंवागोंधळलेल्या अशा सर्व प्रकारच्या आवाजांना जागाआहे. स्त्रीवादाला ‘चांगले'' असण्यापेक्षा ‘जबाबदार''असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याला मोठ्या संघर्षाचीजाणीव असायला हवी आणि ती लढाई अजून संपलेलीनाही. सार्वजनिक चर्चेत स्त्रीवादाच्या नावाखालीछोट्या-छोट्या ऑनलाइन लढाया वरचढ होतात. तेव्हात्याचे नेमके काय अर्थ काढायचे? याचा सर्वातधोकादायक अर्थ हा आहे की, आपण स्त्रीवादाचीव्याप्ती एका ‘ब्रँड''पुरती मर्यादित करत आहोत. हा ब्रँडवास्तवापेक्षा ‘व्हायरल'' होण्याच्या क्षमतेवर अवलंबूनआहे. हे स्त्रियांनी गप्प बसण्याचे आवाहन नक्कीच नाहीतर प्रगल्भता आणि सखोलता दाखवण्याचे आवाहनआहे. हे फक्त आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे की,आपला उद्देश केवळ ‘ऐकले जाणे'' हा नव्हता, तरआपला आवाज बदलासाठी असावा हा होता.
(लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.) स्त्रीवादाने आता कदाचित स्वतःलाचथांबून विचारले पाहिजे की, आपणखरोखर एखादी चळवळ उभारत आहोत,की केवळ ‘कंटेंट'' तयार करत आहोत?भारतीय स्त्रीवादाला आपल्याजबाबदाऱ्यांची आणि मोठ्या लढायांचीजाणीव होणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

१०७ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळात १६ फूट बाप्पांवर पहिल्यांदाच 3D मॅपिंग!
कारखेल खुर्दच्या गणपती विसर्जनात चिमुकल्यांनी साकारले महापुरुष-संत! 🙏✨
वर्दीची दुसरी बाजू! पोलिसांनी गणेश मंडळाच्या गाड्याला रेटण्यासाठी केली मदत!
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




