नागपूर: स्वरूप नगर परिसरात राहणाऱ्या हितेश मेहता यांच्या घरात दुपारी तीनच्या सुमारास अचानक पाणी शिरण्यास सुरुवात झाली. काही वेळातच घरात कमरेपर्यंत पाणी साचल्याने ८० वर्षीय कुंता मेहता, त्यांची सून आणि लहान नात घरात अडकून पडले. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे कुटुंबातील पुरुष सदस्य वेळत घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. अखेर नातेवाईकांनी एनडीआरएफ (NDRF) आणि अग्निशमन विभागाशी संपर्क साधल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास बचावकार्य सुरू करण्यात आले.
एनडीआरएफ आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी कुंता मेहता यांना खुर्चीवर बसवून अत्यंत सुरक्षितपणे घराबाहेर काढले. या थरारक बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या पुरामुळे घरातील धान्य, कपडे, पुस्तके, फ्रीज आणि इतर महत्त्वाचे गृहपयोगी साहित्य पूर्णपणे खराब झाल्याने मेहता कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईचा संघर्ष
शहरातील इतर भागांमध्येही पुराच्या पाण्याने थैमान घातले होते. शितल शेंडे या आपल्या लहान मुलांसोबत घरी एकट्याच असताना त्यांच्या घरात अचानक पाणी शिरले. पाण्याची पातळी झपाट्याने वाढून पाणी कमरेपर्यंत पोहोचल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली. आपल्या लहान मुलाचा जीव वाचवण्यासाठी या माऊलीने प्रसंगावधान राखत त्याला थेट कपाटावर बसवले. मदतीची प्रतीक्षा करत त्या अनेक तास पाण्यात अडकून राहिल्या. पुराच्या पाण्यामुळे घरातील खाद्यान्न, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू नष्ट झाल्यामुळे या कुटुंबावर उपाशी झोपण्याची वेळ आली. या कठीण प्रसंगात लोकप्रतिनिधींकडून कोणतीही अपेक्षेप्रमाणे मदत मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाचे मदतकार्य आणि नागरिकांसमोर मोठे आव्हान
सध्या नागपूरमधील अनेक भागांतून पुराचे पाणी ओसरले असले, तरी उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा उभा कसा करायचा, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून नागरिकांना योग्य ती मदत व पुनर्वसन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




