Pune Crime: जुन्या भांडणाचा राग, इनोव्हातून आले, डोक्यात, पाठीवर वार केले; पुण्यात थरारक घटना

Pune  : पुण्यातील बारामतीत एका अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने डोक्यात आणि मानेवर वार करत खून केल्याची घटना घडली आहे. बारामती शहरातील जळोची येथील काळ्या ओढाजवळ काल सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. गणेश वाघमोडे (वय १७) असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे. या घटनेनं बारामतीत खळबळ उडाली आहे. याबाबत नवनाथ उत्तम चोरमले (वय ३९ वर्ष, रा.अहिल्यादेवी चौक जळोची, बारामती) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्याद दाखल केल्यानुसार, जयेश बाळासाहेब माने, शुभम गायकवाड, करण जाधव, अविष गरुड, सोमनाथ जाधव, भोल्या आणि इतर (सर्व,रा.बारामती ता. बारामती जि.पुणे ) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime: किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी शहरातील एका महाविद्यालयात फिर्यादीचा भाचा गणेश वाघमोडे याचे वरील आरोपींशी भांडण झालं होतं. या जुन्या भांडणाच्या कारणावरून बारामती शहरातील जळोची येथील काळ्या ओढ्यानजीक असणाऱ्या पुलाजवळ इनोव्हा गाडीतून आलेल्या वरील आरोपींनी गणेश वाघमोडे याला धारदार शस्त्राने डोक्यात, मानेवर आणि इतरत्र वार करून ठार मारले. असं फिर्यादीत म्हटलं आहे. सदर घटनेचा तपास पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर मस्कर करत आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी १८ ऑगस्ट रोजी गणेश वाघमोडे अल्पवयीन असताना त्याने आणि त्याच्या इतर दोन साथीदाराने शशिकांत कारंडे यांची हत्या केली होती. गणेश वाघमोडे याच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *