44 वर्षीय सारा लव्ह यांच्यासाठी एखादे ॲप तयार करणे सोपे नव्हते. कारण तंत्रज्ञानाशी त्यांचा फारसा संबंध नव्हता. त्यांनी तब्बल दहा वर्षे विमा क्षेत्रात काम केले होते. मात्र नंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने पूर्णवेळ डेव्हलपर बनण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून कोडिंगचे गुंतागुंतीचे जग त्या समजू शकतील. अनेक आठवडे त्या स्वयंपाकघरात लॅपटॉप घेऊन बसत आणि कोडची प्रत्येक ओळ तपासून सुधारत राहिल्या. निराशा आली की त्या स्वतःलाच म्हणत, ‘मोठ्या उद्दिष्टाचा विचार कर.’ त्यांना खात्री होती की एखाद्या महिलेला देखील कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करता आली, तरी त्यांचे ध्येय सफल होईल. कारण स्वतः त्या घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरल्या होत्या आणि अशा ॲपची गरज त्यांनी स्वतः अनुभवली होती. घरगुती हिंसाचाराचा प्रश्न केवळ भारतापुरता मर्यादित नाही. तुर्किये, बांगलादेश व इराक यांसारख्या देशांत त्याचे प्रमाण जगातील सर्वाधिक आहे तर विकसित देशांत अमेरिकेचा क्रमांक वरचा आहे. घरगुती हिंसाचार ही कटू वस्तुस्थिती आहे. ती जवळपास प्रत्येक देशात आढळते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरातील तीनपैकी प्रत्येकी एका महिलेला (सुमारे 30 टक्के) आयुष्यात कधीतरी जोडीदाराकडून शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागतो. डेन्मार्क, फिनलंड आणि पश्चिम युरोपातील काही विकसित देशांनी महिलांच्या सुरक्षा, आर्थिक स्वावलंबनासाठी आणि कायदेशीर हक्कांसाठी मजबूत व्यवस्था उभारली असली तरी घरगुती हिंसाचार पूर्णपणे संपवू शकलेले नाही. कोणत्याही देशाला यश आलेले नाही. त्यामुळे या समस्येवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपाय शोधणे अधिक आवश्यक ठरत आहे. मुंबईत या विषयावर चर्चा सुरू असताना एका मित्राने मला घरगुती हिंसाचारग्रस्त महिलांसाठी तयार केलेले साराचे ‘सिस्टर सिग्नल’ हे ॲप पाहण्याचा सल्ला दिला. मानसिक छळ करणाऱ्या नात्यातील स्वतःच्या अनुभवातून या ॲपची संकल्पना साराच्या मनात आली. त्यांच्या काही नातेवाइकांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. महिलांसाठी भावनिकदृष्ट्या संवेदनशील, सौम्य व व्यावहारिक साधनांची कमतरता पाहून त्यांनी हे ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला. हे ॲप वापरताना महिलांना सुरक्षित, निर्धास्त आणि मानसिकदृष्ट्या शांत वाटावे, अशी त्यांची इच्छा होती. सध्या हे ॲप ॲपल ॲप स्टोअरवर मोफत उपलब्ध असून अद्याप अँड्रॉइड आवृत्ती आलेली नाही. त्याची डेस्कटॉप आवृत्ती sistersignal.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या ॲपची मुख्य संकल्पना म्हणजे ‘गर्ल-कोड’ नावाचा एक आपत्कालीन संदेश पाठवणे. ॲपमधील ‘सेफ्टी’ टॅब एकदाच दाबल्यावर वापरकर्त्याने विश्वासू गट म्हणून निवडलेल्या किमान पाच मित्र किंवा नातेवाइकांना त्वरित संदेश पाठवला जातो. त्या संदेशात असे नमूद असते : ‘मी एका डेटवर आहे आणि परिस्थिती थोडी विचित्र वाटत आहे. कृपया माझी सतत विचारपूस करा आणि दर 15 मिनिटांनी फोन करा. मी फोन उचलला नाही तर लगेच माझ्या घरी किंवा मी पाठवलेल्या ठिकाणी या.’ अशा प्रकारे हे ॲप एकमेकांची काळजी घेणारा आणि संकटात मदतीला धावून येणारा समुदाय उभारण्याचा प्रयत्न करत आहे. ‘सिस्टर सिग्नल’ हे ॲप महिलांना आधार व आवश्यक संसाधने उपलब्ध करून देते, तसेच भारतातही अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. संभाव्य धोक्याची सुरुवातीची चिन्हे गांभीर्याने ओळखणारी, सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणारी आणि संकटात सापडलेल्या महिलांना कोणताही पूर्वग्रह किंवा अनावश्यक चौकशी न करता तातडीने मदत व आवश्यक साधने उपलब्ध करून देणारी यंत्रणा विकसित होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान अशा प्रकारचे सर्वसमावेशक आणि प्रभावी उपाय देऊ शकते. फंडा : नव्या सामाजिक समस्यांची अचूक ओळख करून त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ठोस व परिणामकारक उपाय विकसित करणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांवर लक्ष असेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
महाराष्ट्र
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




