सामूहिक पक्षांतरांच्या या काळात अनेक प्रश्न पुढे येतात.पक्ष का फुटतात? नेते पक्ष का बदलतात? विचारसरणी,तत्त्वनिष्ठा व पक्षनिष्ठेला अजूनही काही महत्त्व उरलेआहे का? तसेच काही पक्षात सतत फूट पडूनही काहीपक्ष मात्र एकसंध कसे राहतात? अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर राजकीयहालचाली घडल्या. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलकाँग्रेसमधील अंतर्गत बंड मोठी घटना ठरली, तर उद्धवठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडली. झारखंडमध्ये‘इंडिया’ आघाडीतील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंगकरून रालोआ समर्थित अपक्ष उमेदवार परिमलनाथवाणी यांना विजय मिळवून दिला. कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालीकाँग्रेसला रालोआतील काही आमदारांकडून क्रॉसव्होटिंगचा लाभ मिळाला. आम आदमी पक्षाचे सातसदस्य कमी झाले तर बिजू जनता दलातील तीन सदस्यएनडीएकडे गेले. यापूर्वी वायएसआर काँग्रेसमधील काहीसदस्यांनीही पक्ष सोडला होता. या सर्व घडामोडींमुळेरालोआ विशेषतः भाजपची संख्या वाढली. शिरोमणीअकाली दलातूनही मनप्रीत सिंह बादल व मनजिंदर सिंहसिरसा यांसारख्या नेत्यांनी बाहेर पडण्याचा मार्गस्वीकारला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस नेत्यांची यादी खूपमोठी आहे. त्यात मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्रीपदापर्यंतपोहोचलेल्या नेत्यांकडे पाहिले तर आसामचे हिमंत बिस्वासरमा, अरुणाचलचे पेमा खांडू आणि त्रिपुराचे माणिकसाहा हे सध्याचे मुख्यमंत्री काँग्रेसमधून आले आहेत. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचाही त्यात समावेश करता येईल. केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू, राव इंदरजित सिंह, जितीन प्रसाद आणि रवनीत सिंह बिट्टू यांचाही उल्लेख करता येईल. पैकी अनेक नेतेकाँग्रेसमधील प्रतिष्ठित राजकीय घराण्यांशी संबंधितआहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह, अशोक चव्हाण, एस. एम. कृष्णा, नारायण दत्त तिवारी, दिगंबर कामत, किरण कुमार रेड्डी, विजय बहुगुणा यांसारखे अनेक माजी मुख्यमंत्रीही भाजपमध्ये दाखल झाले. मात्र पेमा खांडू यांचा अपवाद वगळता बहुतेकांना अपेक्षित राजकीय लाभ मिळालेलानाही. आज विविध पक्षांतील नाराज नेत्यांना भाजप आकर्षित करतो, अशी धारणा निर्माण झाली आहे. त्यासोबतच‘साम, दाम, दंड, भेद’ या राजकीय तंत्राचाही वापर होत असल्याचे आरोप होतात. दोन-तृतीयांश सदस्यांना सोबत घेऊन स्वतंत्र गट तयार करणे आणि तोच मूळ पक्ष असल्याचा दावा करणे, ही रणनीती आता प्रभावीपणेवापरली जात असल्याचे दिसते. यातून आणखी एक प्रश्न निर्माण होतो की विरोधी पक्षांत फूट पाडण्याची पद्धत हीनवी आहे का? प्रत्यक्षात काँग्रेसनेही भूतकाळात अशा राजकीय डावपेचांचा वापर केला होता. एस. आर. बोम्मई प्रकरणातील 11 मार्च 1994 च्यासर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी काँग्रेसने कलम 356चा वापर करून अनेक विरोधी पक्षांची राज्य सरकारेबरखास्त केली होती. आज मात्र विस्तारासाठी थेटराजकीय ‘अधिग्रहण’ करण्याची पद्धत अधिक दिसूनयेते. अनेक पक्ष वारंवार फुटतात, पण काही पक्षांत अशीपरिस्थिती दिसत नाही. भाजप, समाजवादी पक्ष आणिडावे पक्ष ही त्याची उदाहरणे मानली जातात. डाव्या पक्षांतलेनिन-ट्रॉट्स्की किंवा मॉस्को-बीजिंग विचारांवरूनमतभेद झाले, तरी व्यापक डावी चळवळ एकत्र राहिली.आज हे पक्ष सत्तेबाहेर असून इतिहासातील कमकुवतटप्प्यावर आहेत, तरी त्यांच्यातील नेते मोठ्या प्रमाणावरइतर पक्षांकडे जाताना दिसत नाहीत. 2014 मध्ये काँग्रेसलोकसभेत केवळ 44 जागांवर आली, तर 1984 मध्येभाजप फक्त दोन जागांवर मर्यादित राहिला होता. तरीहीभाजपमध्ये मोठी फूट पडली नाही. भारतीय जनसंघापासूनच्या 75 वर्षांच्या इतिहासात 2014पूर्वी भाजप केवळ सहा वर्षे सत्तेत होता, तरी पक्षाचीसंघटनात्मक एकता कायम राहिली. त्यात एकउल्लेखनीय व अल्पकालीन पक्षांतराचे उदाहरणगुजरातचे शंकर सिंह वाघेला यांचे आहे. याउलट काँग्रेस अनेक वेळा विभाजनातून गेली.भाजपमध्ये काही उल्लेखनीय मतभेद झाले. बलराजमधोक यांनी आर्थिक धोरणांवर अटल बिहारी वाजपेयीआणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी तीव्र मतभेद व्यक्तकेले. ते जम्मूतील ‘स्वयंसेवक’ होते. त्यांच्याअध्यक्षतेखाली पक्षाने 1967 च्या निवडणुकीत 35 जागाजिंकल्या होत्या. ही तेव्हा सर्वांत मोठी संख्या होती. 1973 मध्ये त्यांना जनसंघात दुय्यम स्थान मिळाले आणित्यांनी नेतृत्वावर कठोर टीका केली. त्यानंतर ते नाराजझाले. मात्र त्यांनी कोणत्याही विरोधी पक्षात प्रवेश केलानाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, 1980 मध्ये तत्कालीनपंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना मंत्रिपदाची ऑफर दिलीहोती, परंतु स्वयंसेवक म्हणून त्यांनी ती नाकारली, असेत्यांनीच एका मुलाखतीत ही बाब सांगितली होती. पुढे कल्याण सिंह, उमा भारती आणि बी. एस. येदियुरप्पायांनी बंडखोरी केली, पण अखेरीस ते पुन्हा भाजपमध्येपरतले. शंकरसिंह वाघेला काँग्रेसच्या पाठिंब्याने वर्षभरमुख्यमंत्री राहिले, नंतर त्यांनी स्वतःचा गट काँग्रेसमध्येविलीन केला, दोनदा खासदार झाले आणि 2004 मध्येकेंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रीही बनले. आज हे 85 वर्षीय नेतेसक्रिय राजकारणापासून दूर आहेत. भाजपमध्ये असंतोषाची उदाहरणे दिसली तरी मोठ्याप्रमाणावर बंडाळी झालेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघव कार्यकर्त्यांमधील गुरु-शिष्य नात्याने त्यांच्या एकजूटदाखवून दिली. यात सत्ताही घरात उदयाला आलेल्यानेत्यांच्या हाती राहिली. त्यात वैचारिक शुद्धता राहिलीआहे. ( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)
साम, दाम, दंड, भेद...विविध पक्षांमध्ये उपेक्षित ठरलेल्या अनेकनेत्यांसाठी भाजप आज चुंबकासारखाठरला आहे, असे म्हणता येईल. कारणराजकीय लाभ मिळण्याची शक्यता तिथेअधिक दिसते. त्यासाठी ‘साम, दाम, दंड,भेद’ ही नीती वापरली जाते. या प्रकारातकाँग्रेसचाही इतिहास राहिला आहे. कलम356 चा वापर करून विरोधी पक्षांचीसरकारे बरखास्त केल्याचे दिसून येते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
महाराष्ट्र
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
























Subscribe to my channel




