…म्हणे कायद्याचे रक्षक! पोलीस मुख्यालयातील कर्मचारी गांजा तस्करांच्या टोळीत, 4.75 कोटींचा मुद्देमाल जप्त

image

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: आतापर्यंत आपण गांजा तस्करी करताना पोलिसांनी आरोपींना पकडण्याच ऐकलं आहे. मात्र आता कोट्यावधीच्या गांजा तस्करीत बुलढाणा पोलीस दलातील नियंत्रण कक्षातील प्रदीप मुसदवाले हा कर्मचारी सहभागी असल्याचं समोर आलं आहे. छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील कोमखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 कोटी 75 लाख रुपयांचा गांजा ओरिसातून छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात आणताना पकडला गेला. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अक्षय भोरजे व शुभम आवटे या दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणात छत्तीसगडमधील कोमाखान पोलीस स्थानकाच्या हद्दीत FIR क्र 03/2026 नुसार NDPS ऍक्ट अंतर्गत कलम 20(ख)(2)(C), 29 आणी संबंधित कलमांसह कलम 338, 336(3),340(2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *