संसदेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत जुने आणिअप्रासंगिक कायदे रद्द करण्यासाठी तसेच न्यायप्रक्रियेलागती देण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकणारा कायदा मंजूरकेला आहे. जन विश्वास अधिनियम, 2026 एप्रिलमध्येलागू झाला होता. या कायद्याद्वारे न्यायव्यवस्थेच्याकामकाजात अडथळा ठरणारे अनेक कायदे रद्द केलेगेले. त्याअंतर्गत एक हजारांहून अधिक कायदे हटवले असून त्याचे न्यायपालिकेवर दूरगामी परिणाम होतील. विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसीचे अचरज कौर टुटेजा, ईशान बंबा आणि नवेद महमूद अहमद हे त्या पथकाचाभाग होते. त्यांनी उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाला (डीपीआयआयटी) ही प्रक्रिया अधिकप्रभावी करण्यासाठी मदत केली. त्यांनी एका लेखातनमूद केले की, 2026 च्या या कायद्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची व्यापक व्याप्ती. संसदेने एका प्रक्रियेत 23मंत्रालयांशी संबंधित 79 केंद्रीय कायद्यांत दुरुस्ती केली.784 तरतुदींमध्ये बदल केले आणि 1,018 गुन्ह्यांवरत्याचा परिणाम झाला. त्यामुळे भारतातील आजवरचीही सर्वात मोठी ‘गुन्हामुक्तीकरण’ मोहीम ठरली आहे.रद्द करण्यात आलेल्या अनेक कायद्यांची निर्मितीस्वातंत्र्यानंतर झाली होती. त्यांपैकी काही कायद्यांमध्येसामान्य दैनंदिन कृतींनाही गुन्हा मानले जात होते.‘विधी’च्या कायदेतज्ज्ञांनी एक उदाहरण दिले आहे.समजा, एखादा फेरीवाला रेल्वे स्थानकाबाहेर चहाचाछोटा स्टॉल चालवतो आणि त्यातून उदरनिर्वाह करतो.मात्र रेल्वे परिसरात परवाना नसताना फेरी लावल्यासत्याला एक वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकत होता.त्यामुळे तो सतत शिक्षेच्या धोक्यात राहत होता. अशाचअनेक दैनंदिन कृतींनाही गुन्ह्याचे स्वरूप देण्यात आलेहोते. उदाहरणार्थ, दुसऱ्या प्रवाशाला वाटप केलेली जागारिकामी करण्यास नकार देणे, छावणी परिसरात भीकमागणे किंवा सहा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्यामुलाला सार्वजनिक ठिकाणी शौच करू देणे. काही गुन्हेपूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचे होते. विवरणपत्र दाखल नकरणे, परवाना सादर न करणे किंवा लेखीपरवानगीशिवाय जाहिरात करणे. ही कृत्ये ना गंभीर हानीपोहोचवणारी होती, ना ती गुन्हेगारी हेतूने केली जातहोती. त्यातून काही नुकसान झालेच, तरी ते सहज दुरुस्तकरता येण्यासारखे होते. इंग्रजांच्या काळातील अनेककायदेही रद्द करण्यात आले आहेत. त्यात ब्रिटिशअधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ठरवलेल्या किरकोळकृतींचाही समावेश होता. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यपूर्वकाळात विहिरीजवळ अंघोळ करणे हा गुन्हा मानलाजात होता आणि एप्रिल 2026 मध्ये तो कायदा रद्दहोईपर्यंत अस्तित्वात होता. वसाहतवादी राजवटीपासून तेस्वतंत्र भारतापर्यंत अनेक दशकांत अशी कायदेशीरव्यवस्था विकसित झाली. तिने सामान्य नागरिकांनाशिक्षा देण्यावर भर दिला.राज्यसत्तेला अमर्याद अधिकारदिले. त्यामुळे आजही अनेक नागरिकांना ‘तारीख पेतारीख’ अशा न्यायप्रक्रियेचा सामना करावा लागतो. मात्र,जन विश्वास अधिनियमसारखे सुधारात्मक उपक्रमसकारात्मक परिणाम घडवून आणू शकतात. हा कायदालोकसभेत मंजूर झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्रानेराज्यातील 80 कालबाह्य कायदे रद्द केले. त्यापैकी काहीतर अतिशय जुन्या काळातील होते. उदाहरणार्थ, 1864आणि 1909 मधील व्हिपिंग ॲक्टनुसार चोरी किंवादुष्कर्मासाठी कमाल 150 फटक्यांची शिक्षा देण्याचीतरतूद होती. तथापि, कायद्यांच्या पुस्तकांची हीसाफसफाई यापूर्वीच व्हायला हवी होती. जन विश्वासअधिनियम, 2026 अंतर्गत कालबाह्य कायदेहटवण्याबरोबरच फौजदारी न्यायव्यवस्थेलाही नव्याप्रशासकीय चौकटीची आवश्यकता आहे. वरिष्ठवकिलांकडून वारंवार तहकूब मागण्यावर निर्बंध आणलेपाहिजेत. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (एनजेएसी)पुन्हा लागू करणेही आवश्यक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) स्वातंत्र्यपूर्व काळात विहिरीजवळ स्नानकरणे हा गुन्हा मानला जात होता. एप्रिल2026 मध्ये तो कायदा रद्द होईपर्यंत तोलागूही होता. वसाहतवादी काळात अशीकायदेशीर चौकट तयार होती. त्यातनागरिकांना शिक्षा देण्यावर भर होता.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




