कोल्हापूरः गर्भपात आणि गर्भलिंग निदानासाठी निवृत्त सिव्हील सर्जनकडे येणाऱ्यांमध्ये काही शिक्षक, इंजिनिअर, व्यावसायिक, शेतकरी आणि कामगार वर्ग अधिक असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर २५० गर्भपात केल्याची नोंद आहे. पैकी सध्या ४० दाम्पत्यांकडे केलेल्या चौकशीत पहिल्याच यादीत या सर्वच सुशिक्षित लोकांची नावे आहेत. त्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
कदमवाडी रोडवरील भीमनगर हाऊसिंग सोसायटीमधील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये निवृत्त सिव्हील सर्जन डॉ. चंद्रकांत गायकवाड याने २५० हून अधिक गर्भपात केल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. देशात एकीकडे 'बेटी बचाव, बेटी पढाओ'च्या मोठ्या वल्गना केल्या जात असताना, दुसरीकडे मात्र सुशिक्षित समाजाची विकृत मानसिकता उघडी पडत आहे. स्त्री भ्रूणहत्येच्या या 'कत्तलखान्यात' जाणाऱ्यांमध्ये अशिक्षितच नव्हे, तर समाजातील तथाकथित सुशिक्षित आणि पांढरपेशा वर्ग आघाडीवर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
एजंटाना १० हजार रुपये आणि डॉक्टरला २० हजार रुपये अशा तीस हजार रुपयांत गर्भलिंग निदान आणि ५० हजारांत गर्भपात केला जायचा. वंशाला दिवाच हवा, अशी खूणगाठ बांधून आलेल्या सुशिक्षित कुटुंबियांनी मागेल तेवढी रक्कम एजंट आणि डॉक्टरांना दिली असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.
एमआयडीसीतील कामगार अधिक
डॉक्टर आणि एजंटानी दिलेल्या यादीत एमआयडीसीतील कामगारांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात विखुरलेल्या एजंटांनी या डॉक्टरांचा संबंधिताना पत्ता दिला. अन्य ठिकाणापेक्षा कमी खर्चात, विश्वासाने गर्भलिंग तपासणी केल्याचे सांगत एजंटानी या कामगारांच्याकडून पैसे उकळले.
केसपेपरच्या नोंदीच नाहीत
गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताच्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारच्या नोंदी नाहीत. त्याचे केसपेपरही केलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अटकेतील डॉक्टर, एजंटानी दिलेली नावे आणि पत्त्यानुसार दाम्पत्याकडे चौकशी सुरू आहे. रेकॉर्डवर २५० आकडा आला असला तरी हा आकडा मोठा असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वंशाच्या दिव्यासाठीच
सरकारकडून मुलगी वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. जाहिराती, प्रबोधन आणि योजनांचा सुकाळ आहे; मात्र वास्तव याच्या अगदी उलट आहे. सुशिक्षित मंडळी दिव्याच्या हव्यासापोटी पोटच्या गोळ्याची हत्या करत असल्याचे उघड होत आहे.
"डॉक्टर आणि एजंटानी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात ४० जण आहेत. अनेक दाम्पत्यांना बोलावून या प्रकाराची कसून चौकशी केली जात आहे. यामध्ये सर्वच सुशिक्षित मंडळी आहेत. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, करवीर
"
"शिक्षणाने डोके उजळले, पण मन आणि विचार मात्र अजूनही अंधारातच आहेत, हेच या घटनेने सिद्ध केले आहे. अशा विकृत सुशिक्षित नराधमांवर कठोर कारवाई झाली नाही, तर सरकारी 'बेटी बचाव' मोहीम केवळ कागदी घोडे नाचवण्यापुरतीच मर्यादित राहील. गीता हासूरकर, सामाजिक कार्यकर्त्या'
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



