पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत

पुणे: हत्याकांडाची भयंकर घटना घडली. सिंहगड रोड परिसरात भरचौकात तरुणाची मारहाण करत निघृण हत्या करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी ही हत्याकांडाची घटना घडल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. एरियाच्या वादावरून टोळक्याने तरुणाला जागीत संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये डीजेवर नाच्यावरून वाद झाला होता. अल्पवयीन आरोपींसह इतर १० जणांनी तरुणावर जीवघेणा हल्ला केला. १५ आरोपींनी भरचौकात तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुभम राजू घोडके (वय २२ वर्षे) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुना वाद डोक्यात धरून १५ जणांच्या टोळक्याकडून जबर मारहाण करण्यात आली. पर्वती पोलिस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी ५ अल्पवयीन आरोपींसह एकूण १० जणांना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डीजेवर नाचण्यावरून पुण्यातील आंबेगाव पठार आणि तुकाई नगर या दोन परिसरातील टोळक्यांमध्ये वाद झाला होता. याच वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झालं. शुभम घोडके या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. पर्वती पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.



गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *