
Prakash Ambedkar on Lok Sabha Elections : वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण 48 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून आपली उमेदवारी घोषित केली असून त्यांच्या या उमेदवारीला येणाऱ्या खर्चास हातभार लागावा, म्हणून धुळ्यातील शंकर खरात या कार्यकर्त्याने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त तब्बल पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असून ते विविध ठिकाणी आदिवासी परिषदेच्या माध्यमातून आदिवासींचे हक्क आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात जनजागृती करीत आहेत. प्रकाश आंबेडकर हे काल धुळे शहराच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत आदिवासी परिषद पार पडली. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण 48 जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपण देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले असून आपण स्वतः अकोला मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.

विशेष म्हणजे याच मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हे एकदा विजय देखील झाले असून त्यांच्या या लोकसभेच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीसाठी येणाऱ्या खर्चात हातभार लागावा. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकर खरात यांनी पन्नास हजार रुपयांचा धनादेश काल प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला. शंकर खरात यांचा चिरंजीव जय खरात यांच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून त्यांनी हा पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रकाश आंबेडकर यांना दिल्याने त्यांच्या या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून स्वागत केले जात आहे. शंकर खरात यांच्या या निर्णयाचे संपूर्ण धुळे जिल्ह्यात आणि राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये स्वागत केले जात आहे.
आज सटाण्यात आदिवासी हक्क परिषद
धुळ्यानंतर आज नाशिक च्या सटाणा शहरात आदिवासी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर आज या सभेच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी हक्क परिषद महत्त्वाची मानले जात आहे. आदिवासींवर होणारा अत्याचार आणि आदिवासींचे हक्क यावर विशेष प्रकाश टाकण्यात येणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




