
Babanrao Dhakne Passes Away : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचं निधन झालं असून ते 87 वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं.अहमदनगर च्या साईदीप रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं.
|
NMC Election News : आधी लोकसभा, मगच महापालिका निवडणुका; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारी |
उद्या पाथर्डीत अंत्यसंस्कार
मागील 12 दिवसांपासून न्युमोनिया आजारावर ते उपचार घेत होते. मात्र सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपरी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा प्रदीर्घ आजाराने आज अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये निधन झालं. बबनराव ढाकणे हे माजी केंद्रीय मंत्री असून ते चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. 1994 साली महाराष्ट्रात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राहिले होते. अहमनगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यातील अकोले या छोट्याश्या गावात 10 ऑक्टोबर 1937 ला एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. घरातून कोणताही राजकीय वारसा नव्हता. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ओढले गेले. गोवा समुक्ती संग्रामात भाग घेण्यासाठी शाळा नववीत असताना सोडून दिली.
विधिमंडळाच्या अधिवेशनात गॅलरीतून मारलेल्या उडीनं आयुष्याला कलाटणी
8 जुलै 1968 रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री कुठल्यातरी महत्वाच्या विषयावर बोलत होते. अचानक प्रेक्षक गॅलरीतून कसलासा आवाज झाला. खाली बसलेल्या आमदारांवर पत्रकांचा वर्षाव होऊ लागला. जोरदार घोषणाबाजी सुरू होती. गॅलरीतून खाली उडी मारायचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पकडलं होतं. ते बबनराव ढाकणे होते, तेव्हापासून बबनराव ढाकणे हे नाव चर्चेत आलं. त्यानंतर एका उडीच्या प्रयत्नानं पाथर्डी तालुक्यातील अनेकांचं भविष्य उजळलं. पुढे राजकीय जीवनात उतरायचं ठरवलं आणि काँग्रेसच्या विचारांकडे ते ओढले गेले. 1958 साली यशवंतराव चव्हाण भगवानगडावर आले होते. तेव्हा त्यांची ओळख झाली या आधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.
1967 साली राजकारणात पाऊल ठेवत टाकळीमानूर गटातून त्यांनी जिल्हापरिषदेसाठी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पाथर्डी विधानसभा मतदारसंघातुन ते 1978 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. पुढे ते पाच वेळेस आमदार राहिले. त्याचवेळी पुलोद मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री म्हणून तर 1979 पुलोद ग्रामविकास मंत्री म्हणूनही काम पाहिलं. 1989 साली विधानसभेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी 10 नोव्हेंबर 1989 साली बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जनता दलतर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले. त्यावेळी केशरकाकू क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



