जुन्नर: हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरातील सदाबाजार पेठेत मंगळवारी काही इसमांनी हातात धारदार कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
सदाबाजार पेठेमध्ये पाच ते सहा जणांनी भरदिवसा हातात धारदार कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी मोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ करत होते. या घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
कोणावर गुन्हे दाखल?
या प्रकरणी पोलिस अंमलदार कैलास केंद्रे यांनी फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी अरबाज हमीद हलवाई, इरफान माजिद हलवाई, शायरा माजीद हलवाई, मुस्कान अरबाज हलवाई, मोहसीन इकबाल आतार आणि एक अल्पवयीन मुलगा अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील इरफान हलवाई याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
नागरिकांमध्ये संताप:
जुन्नर शहरात 'कोयता गँग'ची दहशत पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याने स्थानिक नागरिक, महिला आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. आरोपींनी थेट पोलिस यंत्रणेलाच आव्हान दिल्यासारखा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- नाशिक: सिंहस्थ २०२७ साठी नाशिक सज्ज: शहरात उभारले जाणार २८ नवे रस्ते
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
महाराष्ट्र
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- महाराष्ट्र: रेशनधारकांसाठी मोठा दिलासा, आता एकाच वेळी मिळणार तीन महिन्यांचे धान्य
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!


























Subscribe to my channel

