आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आताएआय आपले जग बदलणार का, हा राहिलेला नाही.कारण ते बदलण्यास त्याने आधीच सुरुवात केली आहे.आता जगाला या तंत्रज्ञानासाठी एका नैतिकदिशादर्शकाची गरज आहे. याच विचारातून मी जिनिव्हायेथे झालेल्या एआय फॉर गुड ग्लोबल समिटमध्ये 170देशांतील 12 हजारांहून अधिक प्रतिनिधींसमोर‘करुणामूलक एआय’ (Compassionate AI) हीसंकल्पना मांडली. एआय केवळ नफा आणि सत्तेचे साधन न बनताव्यापक जनहितासाठी काम करावे, असे आपल्याला खरोखर वाटत असेल, तर एआय अभियंते आणि विकसकांना एक महिन्यासाठी त्यांच्या प्रयोगशाळांबाहेर पाठवले पाहिजे. त्यांनी खाणी आणि कारखान्यांमध्येकाम करणाऱ्या बालकामगारांना भेटले पाहिजे.संघर्षामुळे विस्थापित कुटुंबांशी संवाद साधला पाहिजे. गरिबी, भेदभाव व सामाजिक बहिष्कार सहन करणाऱ्या वंचित समाजघटकांसोबत काही काळ घालवलापाहिजे. त्यांचे आयुष्य तंत्रज्ञानापेक्षा अन्यायामुळेअधिक प्रभावित झाले आहे, अशा लोकांसोबत त्यांनी चालले पाहिजे. केवळ एका महिन्याचा असा अनुभवहीएखाद्या व्यक्तीची विचारसरणी बदलू शकतो आणित्याचा परिणाम ते विकसित करत असलेल्यातंत्रज्ञानाच्या दिशेवर होऊ शकतो. एआयने शिक्षण,आरोग्यसेवा, उद्योग, प्रशासन आणि संशोधन या क्षेत्रांनाआधीच नवे स्वरूप दिले आहे. मात्र प्रत्येक तांत्रिकक्रांती ही नैतिक परीक्षाही असते आणि एआय त्यालाअपवाद नाही. आज आपल्या समोरचा सर्वात मोठाधोका म्हणजे आपण महत्त्वाचा प्रश्नच विसरत आहोत.तो म्हणजे ही बुद्धिमत्ता नेमकी कोणाच्या सेवेसाठीआहे? जागतिक स्तरावरील बहुतांश चर्चा नैतिक एआयव जबाबदार एआय याभोवती केंद्रित आहेत. मात्रअधिक सक्षम प्रशासन, अर्थपूर्ण उत्तरदायित्व आणिप्रभावी नियमन यांचीही गरज आहे. नैतिकता आपल्यालायोग्य-अयोग्याची जाणीव करून देते. कायदे मर्यादाआखू शकतात, पण अब्जावधी लोकांच्या आयुष्यावरपरिणाम करणारे तंत्रज्ञान घडवणाऱ्यांची मानसिकताबदलू शकत नाहीत. त्यासाठी अधिक खोल मूल्याचीआवश्यकता आहे आणि ती म्हणजे करुणा. करुणाम्हणजे केवळ सहानुभूती, दयाळूपणा किंवा परोपकारनव्हे. ती या सर्वांपेक्षा वेगळी आहे. ती केवळ भावनाकिंवा अमूर्त नैतिक आदर्शही नाही. आपण दुसऱ्याचेदुःख स्वतःचे मानतो तेव्हा करुणेची सुरुवात तेव्हा होते.हीच भावना आपल्याला त्या व्यक्तीची वेदना कमीकरण्यासाठी कृती करण्यास प्रवृत्त करते. त्यासाठीआवश्यक धैर्यही करुणेतच असते. करुणा आपल्यालाकेवळ व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवण्याकडे नेतनाही, तर मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याची प्रेरणाहीदेते. करुणामूलक एआय इतर चौकटींपेक्षा वेगळे आहे,कारण त्याची सुरुवात तंत्रज्ञानापासून नव्हे, तरमानवतेपासून होते. एखादी प्रणाली काय करू शकते, हाप्रश्न विचारण्यापूर्वी ती कोणासाठी काम करते, हा प्रश्न तेविचारते. अधिक कार्यक्षमतेपूर्वी ते मानवी परिणामांचाविचार करते. नवकल्पनांचा उत्सव साजरा करण्यापूर्वीकोणी मागे तर राहणार नाही ना, याची खात्री करते. आज एआयमधील अनेक त्रुटी—पूर्वग्रह, भेदभाव,बहिष्कार, दिशाभूल करणारी माहिती, पर्यावरणीय हानीआणि बालकल्याणाला निर्माण होणारे धोके—यांनाप्रगतीचे दुर्दैवी दुष्परिणाम म्हणून पाहिले जाते. मात्र त्याकेवळ दुष्परिणाम नाहीत. त्या याचाही पुरावा आहेत की,या प्रणाली विकसित करताना मानवतेच्या हिताचाविचार करणारी व्यक्ती अनुपस्थित होती, तिच्याकडेदुर्लक्ष झाले किंवा तिचे मत ऐकले गेले नाही. सामाजिकमाध्यमांचे दुष्परिणाम आपण आधीच अनुभवले आहेत.त्यामुळे एआय अर्थव्यवस्था कशी बदलेल, हा प्रश्नविचारण्यापेक्षा अल्गोरिदम दुसऱ्याच्या वेदनाजाणण्याची मानवी क्षमता कमी करू लागतील, तेव्हात्याचे परिणाम काय असतील, हा प्रश्न विचारणे अधिकआवश्यक आहे. एआयला वेदना ओळखण्याचेप्रशिक्षणच दिले गेले नसेल, तर तो न्यायाचे रक्षण करूशकेल का? जर त्याचे एकमेव उद्दिष्ट नफा वाढवणेअसेल, तर तो शांततेला प्राधान्य देईल का? हे नैतिकप्रश्न तांत्रिक प्रश्नांपूर्वी विचारले गेले पाहिजेत. कारणमानवतेचे भविष्य घडवण्याची क्षमता त्यांच्यातच आहे. (प्रोजेक्ट सिंडिकेट) एआय विकसकांनी आपल्याप्रयोगशाळांबाहेर पडून खाणी आणिकारखान्यांतील बालकामगारांनाभेटले पाहिजे. विस्थापित कुटुंबांशीसंवाद साधला पाहिजे आणि गरिबी,भेदभाव व सामाजिक बहिष्कार सहनकरणाऱ्या वंचित समाजघटकांमध्येकाही काळ घालवला पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




