'तेरे नाम' चित्रपटातील 'निर्जरा' या भूमिकेतून संपूर्ण देशाला आपल्या प्रेमात पाडणारी अभिनेत्री भूमिका चावला तुम्हाला आठवतेय का? आज तिला अचानक पाहिलं तर ओळखणंही कठीण होतं. सध्या ती काही मोजक्याच सिनेमांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळते.
'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात तिने धोनीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. नुकतंच भूमिकाने ग्लॅमर जगतापासून दूर राहण्यावर आणि तिच्या करिअरमधील चढ-उतारांवर जाहीर भाष्य केलं आहे. तिने स्पष्ट शब्दांत कबुली दिली की, "मी पीआर (PR) आणि मार्केटिंगमध्ये खूप कमी पडले."
भूमिका चावलाला नुकताच एका पुरस्काराने गौरविण्यात आले. या खास प्रसंगी तिने सोशल मीडियावर एक मोठी आणि भावूक पोस्ट शेअर केली. तिने आपले आई-वडील, चाहते आणि स्वतःचेही आभार मानत लिहिले, "२५ वर्ष... आणि कितीतरी वेगवेगळे अनुभव. जेव्हा मी वळून पाठीमागे पाहते, तेव्हा भूतकाळाच्या आरशात सगळं काही धूसर दिसतं... आणि तरीही, सर्व काही तितकंच स्पष्ट आहे..."
तिने पुढे लिहिले, "माझे सर्व दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार, संगीतकार, तंत्रज्ञ, डीओपी (DOP), लेखक, स्टायलिस्ट, सहाय्यक दिग्दर्शक आणि थोडक्यात सांगायचं तर या प्रवासातील संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते."
आईच्या त्या एका सल्ल्याने बदलले आयुष्य
आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना भूमिका म्हणाली, "थँक्यू आई! तू नेहमीच माझा खंबीर पाठींबा म्हणून माझ्यासोबत होतीस. आज मला जाणीव होतेय की तू किती शांत, प्रतिष्ठित आणि माझी खरी ताकद होतीस. माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी मला काहीच समजत नसल्यामुळे तिथून पळून जाण्याची इच्छा होत होती. तेव्हा त्या लहान मुलीला, 'आपण गोष्टींमधून पळ काढायचा नसतो, तर तिथे पाय रोवून उभं राहायचं असतं आणि ते काम पूर्ण करायचं असतं, त्यानंतरही जर तुला ते पुढे करायचं नसेल तर तू खुशाल सोडू शकतेस' हे समजावून सांगण्यासाठी तुझे खूप खूप आभार! थँक्यू पापा आणि थँक्यू माझा छोटा चॅम्पियन... मला इतक्या गोष्टींसाठी प्रेरित आणि प्रोत्साहित केल्याबद्दल."
"मी कोणाला खाली खेचले नाही..."
स्वतःच्या जुन्या रूपाशी संवाद साधताना भूमिका लिहिते, "थँक्यू भूमिका (ती लहान भूमिका), जिने या प्रवासाची सुरुवात केली आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेत ती पुढे जात राहिली. ते निर्णय योग्य असतील किंवा चुकीचे, पण ते पूर्णपणे माझे स्वतःचे होते. कधीही हार न मानल्याबद्दल तुझे आभार... होय, तू कदाचित इतरांसारखी ठरावीक साच्यातली, खूप सुंदर नसशील, किंवा तुझ्या क्षेत्रातील सर्वोत्तम नसशील, पण तू तुझ्या कामाशी नेहमीच प्रामाणिक आणि समर्पित राहिलीस. स्वतः यशाची शिडी चढण्यासाठी तू कधीही कोणाला खाली खेचले नाहीस."
पीआर आणि मार्केटिंगमध्ये झाली चूक
आपल्या कमतरतेबद्दल उघडपणे बोलताना भूमिकाने मान्य केले की, "तू पीआर, मार्केटिंग आणि इतर अनेक गोष्टींमध्ये आणखी चांगली कामगिरी करू शकली असतीस.. असो, या कलेबद्दल, अभिनयाबद्दल आणि हा बिझनेस कसा चालतो याबद्दल अजूनही बरंच काही शिकणं आणि समजून घेणं बाकी आहे..."
शेवटी आपल्या चाहत्यांना आरोग्याचा सल्ला देत तिने लिहिले, "प्रिय मुली, तुला तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आरोग्याची आणि मनाच्या शांततेची काळजी घे. माझ्यावर इतकं भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार. तुम्हीही तुमच्या आरोग्याची आणि मनाच्या शांततेची काळजी घ्या, कारण शेवटी या जगात तीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या या संपूर्ण प्रवासात नेहमी सोबत राहिल्याबद्दल माझे प्रिय कुटुंब आणि मित्रांचे खूप खूप आभार."
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




