2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ 44जागा जिंकल्या होत्या आणि पक्ष सर्वात नीचांकी पातळीवरपोहोचला होता. 2019 मध्ये त्यांना 52 आणि 2024 मध्ये 99जागा मिळाल्या, पण या निवडणुकांमध्ये त्यांची मतदानाचीटक्केवारी सातत्याने 19 ते 21 टक्क्यांच्या दरम्यान राहिली.याचा अर्थ असा की, सरासरी दर पाचपैकी एक भारतीयमतदार काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘हात’ याबटणावर मतदान करत आला आहे. आपण 1996, 1998, 1999 पासून ते 2009 पर्यंतचीआकडेवारी पाहिली, तर असे दिसते की, भाजपचीमतदानाची टक्केवारी साधारणपणे 25 टक्क्यांच्या आसपासराहिली. तो काळ आघाडीच्या राजकारणाचा होता. नरेंद्रमोदींनी 2014 मध्ये हे समीकरण बदलले. त्यानंतर भाजपचीमतदानाची टक्केवारी वाढून 37 ते 40 टक्क्यांच्या घरातपोहोचली. आधीच्या तुलनेत 12 ते 15 टक्क्यांची ही वाढखूप मोठी आहे आणि याला आपण सहजपणे ‘मोदींच्यानावावर मिळणारी मते’ म्हणू शकतो. राहुल गांधी नजीकच्या भविष्यात काँग्रेसची मतदानाचीटक्केवारी वाढवून 37 टक्क्यांपर्यंत नेतील, असा विचारकरणे म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करण्यासारखे होईल,पण त्यांनी काँग्रेसच्या निश्चित मतांच्या टक्केवारीत 5 ते 6टक्क्यांची वाढ जरी केली, तरी राष्ट्रीय राजकारण बदलेल.32 टक्के मते मिळवूनही भाजपचा दबदबा कायम राहील,पण लोकसभेतील त्यांच्या जागांची संख्या 200 च्या थोडीवर किंवा खाली राहू शकते. कदाचित ते सरकार स्थापनकरू शकतात, पण ते आघाडीचे सरकार असेल, ज्यातनेतृत्वाबद्दल अडचणी निर्माण होऊ शकतील. मोदी -शाहांनी हा धोका कधीही हलक्यात घेतलेला नाही. त्यांनामाहीत आहे की, 20 टक्के मतांचा भक्कम पाया असल्याने काँग्रेस हेच त्यांच्यासमोरील एकमेव मोठे आव्हान आहे. आता प्रश्न हा आहे की राहुल यापुढे कुठपर्यंत जातील?सध्या त्यांचे संपूर्ण लक्ष रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्येलोकांना सरकारच्या विरोधात उभे करण्यावर आहे, पणत्यांनी हे समजून घ्यायला हवे की, भारतात राजकीय बदलतेच लोक घडवून आणतात, जे निवडणुका जिंकतात किंवा इतर पक्षांशी हातमिळवणी करून सत्ताधारी पक्षाला पराभूत करतात. केवळ रस्त्यांच्या जोरावर सत्तापालट करण्याचेस्वप्न हा एक भ्रम आहे, संघ आणि लोहियावाद्यांची रस्त्यावरील आंदोलनांवरमजबूत पकड होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बळ मिळूनही जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्माण आंदोलन आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे संपाची संयुक्त ताकद इंदिरागांधींचे सरकार पाडू शकली नाही. त्यासाठी त्यांना 1977च्या निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागली. 2010 ते 2012 या काळात अण्णांचे आंदोलन आणि संघ/भाजप मिळूनहीयूपीए सरकारला सत्तेवरून हटवू शकले नाहीत. याचानिर्णय 2014 च्या निवडणुकीतच होऊ शकला. आता 2029 मध्ये जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा राहुलत्यांच्या राजकीय जीवनाची 25 वर्षे पूर्ण करत असतील.त्यावेळी त्यांचे वय 59 वर्षे असेल. भारतीय राजकारणाच्याहिशेबाने तेव्हाही त्यांना तरुणच मानले जाईल. आपण असेमानले की, काँग्रेस आणि भाजपला आपापल्या विचारांशीसहमत असलेल्या लोकांची मते मिळत राहतील, तरअसेही म्हणता येईल की, मोदींमुळे भाजपला मिळणारी मतेकेवळ कंटाळून राहुल यांच्या पारड्यात जाणार नाहीत.राहुल यांना यापेक्षा नवीन आशा निर्माण करणारा पर्यायद्यावा लागेल. त्यांनी सांगावे लागेल की, ते निवडणूकजिंकले, तर मोदी आणि भाजपपेक्षा वेगळे काय करतील?मी 12 प्रश्न मांडू इच्छितो. 1. निवडणूक आयुक्तांची निवड करण्याची प्रक्रिया कायअसेल आणि निवडणूक आयोगाची नि:पक्षता ते कशी परतआणतील? काँग्रेसच्या काळातील व्यवस्था पुन्हा आणणेही काही उत्साह वाढवणारी गोष्ट नसेल. राहुल यांच्यादिवंगत वडिलांनी 1989 मध्ये निवडणूक आयोगाला तीनसदस्यांची संस्था बनवून कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाहोता. भाजप ज्यांना घुसखोर म्हणते, त्यांना मतदारबनण्यापासून रोखण्यासाठी राहुल काय व्यवस्था करतील?
2. तसेच न्यायव्यवस्था, सीबीआय आणि इतर महत्त्वाच्यातपास यंत्रणांच्या बाबतीत ते काय करतील?
3. ट्रम्प यांचा सामना ते कसा करतील? अमेरिकेबद्दलचेत्यांचे धोरण कशा प्रकारे वेगळे असेल?
4. चीन, पाकिस्तानबाबत त्यांची भूमिका कशी असेल?पाकिस्तानमधून निर्माण होणाऱ्या दहशतवादाच्या बाबतीतत्यांचे धोरण मोदींपेक्षा कशा प्रकारे वेगळे असेल?
5. पश्चिम आशिया आणि इस्रायलबाबत त्यांची भूमिकामोदींच्या भूमिकेपेक्षा कशी वेगळी असेल?
6. ऊर्जा, भांडवल आणि सोन्याच्या कमतरतेतून भारतालाबाहेर काढण्यासाठी त्यांचा दृष्टिकोन काय आहे? यातआपण एआय आणि सॉफ्टवेअर सेवांचाही समावेश करू शकतो. ते भारताला गुंतवणूकदारांसाठी आकर्षक कसेबनवतील?
7. सगळीकडे ‘विद्यार्थ्यांचा आवाज’ ऐकू येत आहे, पणराहुल जास्त रोजगार कसा देतील? कमी शिकलेल्यालोकांसाठी ते मनरेगा सुरूच ठेवतील की त्याचे एखादेनवीन आणि चांगले स्वरूप आणतील? ते मोफत धान्यवाटपाची योजना सुरू ठेवतील का?
8. ते आजही जातीनिहाय जनगणनेला सामाजिक न्यायाचाभाग मानतात का? यातून रोजगाराच्या अधिक संधी कशानिर्माण होतील? तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनास्वतःलाच माहीत नाही की, त्यांनी जी जातीनिहायजनगणना करून घेतली आहे, त्या आकडेवारीचे कायकरायचे आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारयांना त्यांच्या राज्यात झालेल्या जातीनिहाय जनगणनेचीआकडेवारी जाहीर करायला राहुल सांगतील का?
9. शिक्षण व्यवस्थेला भ्रष्टाचारातून मुक्त करण्यासाठी,त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि तरुणांनारोजगारासाठी योग्य बनवण्यासाठी ते कशा प्रकारचे बदलकरू इच्छितात?
10. ते म्हणतात की ते व्यवसाय किंवा भांडवलाच्याविरोधात नाहीत. ते केवळ एकाधिकारशाहीच्या विरोधातआहेत आणि सर्वांना समान संधी देऊ इच्छितात. मगयासाठी ते काय करतील? आर्थिक सुधारणांबाबत त्यांचेविचार काय आहेत?
11. अल्पसंख्याकांना समाजात बाजूला सारले जातअसल्याची तक्रार राहुल करतात, पण राहुल त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी काय करतील?
केवळ रस्त्यांवर संघर्ष करणारा नेता म्हणूनच नाही, तर एकविश्वासार्ह आव्हान म्हणून पुढे येण्यासाठी राहुल यांना याप्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) सत्तापालटाचे स्वप्न...सध्या राहुल गांधींचे संपूर्ण लक्ष रस्त्यांवर आणिगल्ल्यांमध्ये लोकांना सरकारच्या विरोधात उभेकरण्यावर आहे, पण त्यांनी हे समजून घ्यायला हवेकी, भारतात राजकीय बदल तेच लोक घडवतात,जे निवडणुका जिंकतात किंवा इतर पक्षांशीहातमिळवणी करून सत्ताधारी पक्षाला पराभूतकरतात. केवळ रस्त्यावरील संघर्षाच्या जोरावरसत्तापालट करण्याचे स्वप्न हा एक भ्रम आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel




