
Pune : सध्या प्रदूषणाची पातळी वाढली असून, खराब हवेमुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. आता प्रदूषित हवेमुळे शरीरात दाह निर्माण होऊन त्यामुळे हृदयविकाराच्या धोक्यात लक्षणीय वाढ होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला हृदयविकाराच्या रुग्णांना दिला आहे.
अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटीतील इंटरमाउंटन हेल्थमधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या वतीने शिकागोमध्ये आयोजित वैज्ञानिक परिषदेत हे संशोधन सादर करण्यात आले. प्रदूषण वाढल्यानंतर हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये इन्फ्लेमेटरी मार्कर (दाह निदर्शक) सीसीएल २७ आणि आयएल १८ यामध्ये वाढ होत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. याच वेळी हृदयविकाराचा त्रास नसलेल्या रुग्णांमध्ये ही वाढ होत नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. भारतात हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे संशोधन भारतासाठी महत्त्वाचे आहे.
देशात सध्या प्रदूषणाची पातळी चिंताजनक आहे. अनेक शहरांत पीएम २.५ या सूक्ष्म धूलिकणांची पातळी मर्यादेपेक्षा जास्त नोंदविण्यात येत आहे. प्रदूषित हवेमुळे हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक धोका वाढत आहे. पर्यावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी हृदयविकाराचे रुग्ण तयार नसतात. त्यामुळे शरीरातील बदल त्यांच्यासाठी धोकादायक बनतात. या संशोधनात हृदयविकाराचे ४४ रुग्ण आणि हृदयविकार नसलेल्या ३५ जणांचा अभ्यास करण्यात आला. त्यात जास्त प्रदूषण असलेल्या दिवशी हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये दाह निदर्शकांची पातळी वाढल्याचे निष्पन्न झाले. याच वेळी हृदयविकार नसलेल्या व्यक्तींमध्ये हा बदल दिसून आला नाही.
|
Pimpri : चिंचवडमधील थेरगावातील बुथवर पैसे वाटप? राहुल कलाटे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार |
पुण्यातील हवा खराब पातळीवर
पुण्यातील हवेची पातळी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता खराब नोंदविण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कात्रज डेअरी येथील केंद्राने हवा गुणवत्ता निर्देशांक २३८ नोंदविला. त्या खालोखाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील केंद्रात निर्देशांक २०९ नोंदविण्यात आला. दोन्ही ठिकाणी हवेची पातळी खराब होती. याच वेळी कर्वे रस्ता, शिवाजीनगरमधील रेव्हेन्यू कॉलनी, म्हाडा कॉलनी आणि आळंदी परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक सुमारे १२५ नोंदविण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी हवेची पातळी समाधानकारक होती.
प्रदूषणामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना जास्त धोका निर्माण होतो. कोलेस्टेरॉलची उच्च पातळी असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्या तुलनेत प्रदूषणाच्या संपर्कात जास्त काळ असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आणखी वाढते. हवेतील प्रदूषक फुफ्फुसातून थेट हृदयात जाऊन गंभीर परिणाम करतात. त्यामुळे प्रदूषण वाढल्यानंतर हृदयविकाराच्या रुग्णांनी जास्त काळजी घ्यावी.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




