पुणे: 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे देशातील संरक्षण साहित्याचे एकूण उत्पादन १ लाख ७६ हजार कोटी रुपयांच्या टप्प्यावर पोहोचले असून, यामध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. स्फोटके आणि दारूगोळा (Ammunition & Explosives) निर्मितीच्या क्षेत्रात खासगी उद्योग, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा (MSME) सहभाग वेगाने वाढत असून सध्या या क्षेत्रात उतरण्यासाठी १५० हून अधिक कंपन्या औद्योगिक परवाना (Industrial Licence) प्रक्रियेत आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार आणि गुणवत्ता हमी महासंचालनालयाचे (DGQA) महासंचालक एन. मनोहरण यांनी दिली.
पुण्यात गुणवत्ता हमी महासंचालनालयातर्फे (DGQA) आयोजित 'लष्करी स्फोटके आणि प्रोपेलंट: सुरक्षा, अनुपालन आणि गुणवत्ता हमी' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
संरक्षण उत्पादनासाठी 'पुणे' हे देशातील प्रमुख केंद्र: सचिव संजीव कुमार यांनी सांगितले की, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संरक्षण साहित्य आणि दारूगोळा निर्मिती करणाऱ्या उद्योगांचे मोठे जाळे आहे. पुण्यामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (DRDO) 'हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी' (HEMRL) तसेच लष्करी स्फोटके नियंत्रण कार्यालय कार्यरत आहे. त्यामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी आणि नव्या उद्योजकांना तांत्रिक पाठबळ देण्यासाठी पुणे हे देशातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.
सुरक्षेच्या बाबतीत शून्य तडजोड (Zero Tolerance): सरकारी व खासगी दारूगोळा कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांवर भाष्य करताना संजीव कुमार म्हणाले की, सुरक्षेच्या बाबतीत सरकारी आणि खासगी उद्योगांसाठी वेगळे नियम नाहीत. 'CFEES' आणि 'PESO' यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दोन्ही क्षेत्रांना समान सुरक्षा निकष लागू आहेत. नागपूर आणि भंडारा येथील कारखान्यांमधील अपघातांच्या पार्श्वभूमीवर एक स्वतंत्र सुरक्षा सुधारणा आराखडा लागू करण्यात आला असून, त्यावर मंत्रालय सातत्याने देखरेख ठेवत आहे.
नव्या उद्योगांसाठी तंत्रज्ञानाचे ३ पर्याय: नवीन कंपन्यांना स्फोटके व दारूगोळा निर्मितीत येण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे तीन प्रमुख मार्ग उपलब्ध असल्याचे डीजीक्यूएचे महासंचालक एन. मनोहरण यांनी स्पष्ट केले: १. पुण्यातील DRDO - HEMRL कडून तांत्रिक मार्गदर्शन व हस्तांतरण. २. देशातील विद्यमान उत्पादक कंपन्यांशी तांत्रिक सहकार्य. ३. परदेशी कंपन्यांकडून तंत्रज्ञान हस्तांतरण (Technology Transfer).
तसेच, परवानग्या आणि मंजुरीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भागधारकांची संख्या १९ वरून ३ वर आणली असून मंजुरीचा कालावधी ३ ते ६ महिन्यांवरून १ महिन्यापेक्षा कमी करण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel




